Download App

IND vs SA 1st Test बॉक्सिंग डे कसोटीत सुरुवातीलाच भारताला तीन धक्के

IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात झाला आहे. बॉक्सिंग डे सामन्यात (Boxing Day Test) दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून प्रसिद्ध कृष्णाने (Prasidh Krishna) कसोटीत पदार्पण केले. खराब हवामानामुळे सामना सुरू होण्यास उशीर लागला होता.

भारतीय टीम संकटात, विराटकडून अपेक्षा
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाची खराब सुरुवात झाली आहे. सामन्याच्या पाचव्या षटकात टीम इंडियाला धक्का बसला. कागिसो रबाडाने रोहित शर्माला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. रोहितला केवळ 5 धावा करता आल्या. त्यानंतर यशस्वी जैस्वालच्या रुपात भारताला दुसरा धक्का बसला. आंद्रे बर्जरच्या चेंडूवर यशस्वी जैस्वाल बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर मैदानात आलेला शुभमन गिलही केवळ 02 धावा करून बाद झाला. आता विराट कोहली आणि श्रेयस अय्यरकडून मोठी भागीदारी अपेक्षित आहे. अय्यर 8 तर कोहलीने 4 धावांवर खेळत आहे. भारताची धावसंख्या तीन गडी बाद 38 धावा आहे.

Manoj Jarange : आम्ही सज्ज, तयारीही पूर्ण; जरांगेंनी सांगितलं मुंबईतील उपोषणाचं प्लॅनिंग

प्रसिद्ध कृष्णाचे पदार्पण
भारतीय कर्णधार रोहित शर्माने युवा वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णाला पदार्पणाची संधी दिली. उपकर्णधार जसप्रीत बुमराहने कृष्णाला कसोटी कॅप दिली.

बॉक्सिंग डे टेस्ट का म्हणतात?
कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे टेस्ट म्हणतात. खरं तर, दक्षिण आफ्रिका आणि ऑस्ट्रेलियामध्ये दरवर्षी ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी खेळल्या जाणार्‍या कसोटी सामन्याला बॉक्सिंग डे टेस्ट म्हणतात.

दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन
टेम्बा बावुमा (कर्णधार), डीन एल्गर, एडन मार्कराम, टोनी डी झोर्झी, कीगन पीटरसन, डेव्हिड बेडिंगहॅम, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जॅनसेन, जेराल्ड कोएत्झी, कागिसो रबाडा आणि नांद्रे बर्गर.

अभिनेता रोनित रॉय वयाच्या 58व्या वर्षी तिसऱ्यांदा बोहल्यावर! कोणासोबत थाटला संसार?

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा.

पीच रिपोर्ट
सेंच्युरियनची खेळपट्टी दक्षिण आफ्रिकेतील सर्वात वेगवान खेळपट्ट्यांपैकी एक आहे. पावसाचा अंदाज असल्याने ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अधिक उपयुक्त ठरू शकते. याला दक्षिण आफ्रिकेचा गड असेही म्हणता येईल. मात्र, मागील दौऱ्यात भारतीय संघाने 113 धावांनी आफ्रिकेला हरवले होते.

Tags

follow us