Download App

भरवशाचे फलंदाज ढेपाळले, केएलचे झुंझार शतक; पहिला डावात सन्माजनक धावसंख्या

IND VS SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND VS SA) यांच्यातील पहिली कसोटी सेंच्युरियनमध्ये खेळवली जात आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजी करायला आलेल्या टीम इंडियाचा पहिला डाव 245 धावांवर आटोपला. भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 8 विकेट्सवर 208 धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. टीम इंडियाच्या यष्टीरक्षक फलंदाज केएल राहुलने (KL Rahul) शानदार शतक झळकावले. त्याने 137 चेंडूत 101 धावा केल्या. या खेळीत त्याने 14 चौकार आणि 4 षटकार मारले.

दक्षिण आफ्रिकेसाठी कागिसो रबाडा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. कागिसो रबाडाने 20 षटकांत 59 धावांत 5 खेळाडू बाद केले. पहिली कसोटी खेळताना नांद्रे बर्जरने 3 विकेट घेतल्या. मार्को युनसेन आणि जेराल्ड कोएत्झी यांना 1-1 विकेट घेतली.

अशी झाली भारताची फलंदाजी
भारतीय संघाने दुसऱ्या दिवशी 8 बाद 208 धावांवर खेळण्यास सुरुवात केली. आज टीम इंडियाला पहिला झटका 238 धावांवर बसला. 22 चेंडूत 5 धावा करून मोहम्मद सिराज जेराल्ड कोएत्झीच्या चेंडूवर बाद झाला. पहिल्या दिवशी केएल राहुल 70 धावांवर नाबाद परतला होता. आज त्याने शतकाचा आकडा गाठला. शतक झळकावल्यानंतर केएल राहुल नांद्रे बर्जरच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला.

Prajakta Mali : मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळीचा ग्लॅमरस अंदाज

केएल राहुलशिवाय इतर फलंदाजांना पन्नासचा टप्पा देखील गाठण्यात आला नाही. विराट कोहलीने 38 धावांचे योगदान दिले. पण केएल राहुलने खालच्या फळीतील फलंदाजांसह टीम इंडियाची धावसंख्या 245 धावांपर्यंत नेली.

नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. भारतीय फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. सलामीवीर यशस्वी जैस्वालने 17 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा 5 धावा करून बाद झाला. शुभमन गिल 2 धावा करून परतला.

Aankh Micholi Serial: ‘स्टार प्लस’ प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे, सासू-सुनेची नवी ‘आँख मिचोली’!

विराट कोहली आणि श्रेयस अय्यरने अनुक्रमे 38 आणि 31 धावा केल्या. मात्र, केएल राहुलच्या शतकामुळे भारतीय संघ सन्मानजनक धावसंख्या गाठण्यात यशस्वी ठरला. मात्र, आता भारतीय गोलंदाज कोणती कामगिरी करतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

follow us