ऑस्कर विजेता ‘पॅरासाइट’ फेम ली सन-क्यूनचं निधन; संशयास्पद आढळला मृतदेह

ऑस्कर विजेता ‘पॅरासाइट’ फेम ली सन-क्यूनचं निधन; संशयास्पद आढळला मृतदेह

Lee Sun Kyun Death: ऑस्कर विजेते चित्रपट ‘पॅरासाइट’चे (Parasite) सुप्रसिद्ध दक्षिण कोरियातील अभिनेते ली सन-क्यून (Lee Sun Kyun) यांचे निधन झाले. ते 48 वर्षांचे होते. ड्रग्ज प्रकरणी विरोधात सरकारकडून सुरू असलेल्या कारवाईदरम्यान ही धक्कादायक बातमी समोर आली आहे. ली सन-क्यूनची देखील कथित ड्रग्स प्रकरणी सध्या चौकशी सुरु होती.

मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी सोलमधील एका पार्कमध्ये विटांच्या जवळ कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आले आहे. लीच्या पत्नीने अभिनेत्याच्या बेपत्ता झाल्याची माहिती पोलिसांना दिली होती आणि सांगितले होते की अभिनेत्याने घरी एक सुसाईड नोट सोडली होती, त्यानंतर लीचा शोध घेतला असता तो कारमध्ये मृत अवस्थेत आढळला.

दक्षिण कोरियाकठोर ड्रग्ज कायद्यांसाठी ओळखला जातो, अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांसाठी कठोर दंड आकारतो. गुन्हेगारांना कमीत कमी सहा महिन्यांसाठी तुरुंगवास भोगावा लागू शकतो, पुनरावृत्ती केलेल्या गुन्हेगारांना अंमली पदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्यांना 14 वर्षांपर्यंत तुरुंगवास भोगावा लागतो.

Delivery Boy: ‘डिलिव्हरी बॉय’चे पहिले पोस्टर प्रदर्शित; ‘या’ दिवशी चित्रपट येणार प्रेक्षकांच्या भेटीला

1975 मध्ये जन्मलेल्या ली सन-क्यून यांनी “पॅरासाइट” मधील एका श्रीमंत कुटुंबातील वडिलांच्या भूमिकेसाठी आंतरराष्ट्रीय लोकप्रियता मिळवली. दक्षिण कोरियाच्या चित्रपटसृष्टीत त्यांनी आपला विशेष ठसा उमटवला होता. 2012 चा थ्रिलर “हेल्पलेस” आणि 2014 चा हिट “ऑल अबाउट माय वाईफ” सारख्या चित्रपटांमध्ये त्याने आपल्या दमदार भूमिकांनी चाहत्यांच्या हृदयात अनोखं स्थान निर्माण केले.

कोरियन भाषेतील मूळ मालिका “डॉ. ब्रेन” मध्ये लीने मुख्य भूमिका साकारली होती. या वेब शोचा प्रीमियर 2021 मध्ये झाला. सहा भागांचा साय-फाय थ्रिलर कोह से-वोन या कट्टर न्यूरोलॉजिस्टच्या भोवती फिरतो जो रहस्यांचा शोध घेतो. ली यांच्या निधनाच्या बातमीने दक्षिण कोरियाच्या उद्योगसमूहात शोककळा पसरली आहे. त्याच्या सर्व चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube