Download App

IND vs SA : आज टीम इंडिया आफ्रिकेला भिडणार; जाणून घ्या, पिच रिपोर्ट अन् रेकॉर्ड्स

IND vs SA : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा आजपासून सुरू होत आहे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून नामुष्कीजनक पराभव स्वीकारावा लागल्यानंतर परदेशात भारतीय संघाचा हा पहिलाच दौरा आहे. या मालिकेतील पहिला टी 20 सामना आज दक्षिण आफ्रिकेतील डरबनच्या किंग्समीड स्टेडियमवर होणार आहे. आज संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. या मैदानावर आफ्रिकेने अद्याप एकदाही भारताला पराभूत केलेले नाही. या संघांमध्ये डर्बनच्या मैदानावर आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. याआधी भारताने 2018 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी 20 मालिकेत 2-1 असा विजय मिळवला होता.

IND vs SA Schedule: भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा जाहीर, वाचा कधी आणि कुठे होणार सामने ?

टी 20 क्रिकेटचा विचार केला तर आतापर्यंत दोन्ही संघात एकूण 8 मालिका खेळल्या गेल्या आहेत. यामध्ये भारताने चार तर आफ्रिकेने दोन विजय मिळवले आहेत. दोन मालिक अनिर्णित राहिल्या. दोन्ही संघात एकूण 24 टी 20 सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 13 आणि आफ्रिकेच्या संघाने 10 सामने जिंकले आहेत. तर एक सामना ड्रॉ झाला होता.

या मालिकेसाठी टीम इंडियाची कमान सूर्यकुमार यादवच्या हाती देण्यात आली आहे. सूर्याने 2023 मध्ये चांगली कामगिरी केली आहे. विश्वचषकात तो फारसा चमकला नसला तरी एकूणच वर्षभरातच त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या नावावर 16 सामन्यात 577 धावा आहेत. तर ऋतुराज गायकवाड दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने 13 सामन्या 370 धावा केल्या आहेत. गोलंदाजीत अर्शदीप सिंगने सर्वाधिक 25 विकेट्स घेतल्या आहेत.

फलंदाजांची डोकेदुखी वाढणार  

डर्बनमधील किंग्समीड मैदानातील खेळपट्टी गोलंदाजांना जास्त मदत करते. या खेळपट्टीवर चेंडू जास्त उसळी घेतो. अशा परिस्थितीत खेळपट्टी फलंदाजांसाठी डोकेदुखी ठरू शकते. येथे एकूण 18 टी 20 सामने खेळले गेले आहेत. प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने 9 सामने जिंकलेले आहेत तर दुसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करणाऱ्या संघांना 8 सामन्यात विजय मिळाला आहे. या मैदानावरील सर्वोच्चा धावसंख्या 226 धावा आहेत. याच मैदानावर आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होणार आहे.

Ind Vs Aus : रोमहर्षक सामन्यात कांगारुंना नमवलं; भारताचा 2 गडी राखून विजय

भारताचा संभाव्य संघ 

सूर्यकुमार यादव (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, शुभमन गिल, श्रेयस अय्यर, रिंकू सिंग, जितेश शर्मा, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव/रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, सिराज.

आफ्रिकेचा संघ 

एडन मार्कराम (कर्णधार), रीझा हँड्रिक्स, मॅथ्यू ब्रिट्झके/ट्रिस्टन स्टब्स, हेनरिक क्लासेन, डेव्हिड मिलर, डोनोव्हन फेरेरा, मार्को यान्सन/अँडाइल फेलुकॉय, केशव महाराज, जेराल्ड कोएत्झी, तबरेज शम्सी.

Tags

follow us