IND vs SL : विश्वचषक स्पर्धेत आज भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामना (IND vs SL) सुरू झाला आहे. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर हा सामना होत आहे. नाणेफेक जिंकून श्रीलंकेने गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यानंतर टीम इंडियाचे फलंदाज रोहित शर्मा आणि शुभमन गिल फलंदाजीसाठी मैदानात उतरले आहेत. या सामन्यासाठीही भारतीय संघात कोणताही बदल झालेला नाही. भारताला सुरुवातीलाच पहिला धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा फक्त 4 धावा काढून मधुशंकाच्या गोलंदाजीवर क्लिन बोल्ड झाला. मुंबईतील ज्या मैदानावर हा सामना होत आहे. येथेच बरोबर बारा वर्षांपूर्वी भारत आणि श्रीलंका यांच्यात विश्वचषकातील अंतिम सामना झाला होता. या सामन्यात भारताने श्रीलंकेचा पराभव करत विश्वचषक जिंकला होता.
IND vs SL : लंकेचा अँजेलो मॅथ्यूज ‘हिटमॅन’ साठी ठरणार डोकेदुखी; काय आहे पूर्व रेकॉर्ड
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट कोहली मैदानात आला आहे. टीम इंडियाची सुरुवात संथ झाली आहे. या सामन्यातही भारताचा संघ मजबूत दिसत आहे. श्रीलंकेची स्थिती मात्र वाईट आहे. हा सामना श्रीलंकेला कोणत्याही परिस्थितीत जिंकावाच लागणार आहे. त्या इराद्याने श्रीलंकेचा संघ मैदानात उतरला आहे. सामन्याच्या सुरुवातीलात पहिला झटका बसला आहे. मोठी धावसंख्या उभारण्यात रोहित शर्मा अपयशी ठरला. लवकर बाद झाला.
असा भारताचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, शमी, जसप्रित बुमराह, कुलदीप यादव, सिराज.
असा आहे श्रीलंकेचा संघ
पथुम निसांका, दिमुथ करुणारत्ने, कुसल मेंडिस, सदिरा समरविक्रमा, चरिथ असलंका, अँजेलो मॅथ्यूज, दुशान हेमंता, दुष्मंथा चमिरा, महिश तीक्षणा, कसून रजिता, दिलशान मधुसंका