Download App

IND Vs WI : टीम इंडियाच्या फिरकीपुढे वेस्ट इंडिजचा संघ ढेपाळला, भारताला विजयासाठी 115 धावांचे लक्ष्य

  • Written By: Last Updated:

IND Vs WI : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात 3 सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना बार्बाडोसमधील केन्सिंग्टन ओव्हल मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर यजमान वेस्ट इंडिज संघाचा डाव अवघ्या 114 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने 4 तर रवींद्र जडेजाने 3 बळी घेतले.(Ind vs Wi 1st odi west indies give target 115 runs against india kensington oval stadium)

विंडीज संघाची सुरुवात खूपच खराब झाली.

पहिल्या एकदिवसीय सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर विंडीज संघाची सुरुवात खराब झाली. अवघ्या 2 धावा करून हार्दिक पंड्याचा बळी ठरलेल्या काईल मेयर्सच्या रूपाने संघाने 7 धावांवर आपली पहिली विकेट गमावली. यानंतर 45 धावांवर संघाला 2 धक्के बसले, त्यात मुकेश कुमारने अथानाजला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याचवेळी शार्दुल ठाकूरने ब्रँडन किंगला त्याच्या वैयक्तिक स्कोअरवर17 धावांवर त्याच्या सर्वोत्तम चेंडूवर बोल्ड केले.

पुढे शिमरॉन हेटमायर आणि कर्णधार शाई होप यांच्यात 43 धावांची भागीदारी पाहायला मिळाली. परंतु रवींद्र जडेजाने 88 धावांवर हेटमायरच्या रूपाने विंडीज संघाला चौथा धक्का दिला. आणि हि भागीदारी तोडली 96 च्या स्कोअरवर संघाला 5वा धक्का रोवमन पॉवेलच्या रूपाने बसला.

IND vs WI: टीम इंडियाला मोठा धक्का, मोहम्मद सिराज एकदिवसीय मालिकेतून बाहेर

 

रवींद्र जडेजाच्या फिरकी गोलंदाजीसमोर झुंजणाऱ्या विंडीजच्या फलंदाजांसाठी कुलदीप यादवची फिरकी खेळणे आणखी कठीण ठरले. 99 धावांवर विंडीज संघाने डॉमिनिक ड्रेक्सच्या रूपाने आपली 7वी विकेट गमावली. यानंतर, 114 धावांवर, कर्णधार शाई होपच्या रूपाने संघाला 9वा धक्का बसला, जो 43 च्या वैयक्तिक धावसंख्येवर पॅव्हेलियनमध्ये परतला. या सामन्यात विंडीज संघाचा डाव 114 धावांवरच मर्यादित राहिला.

कुलदीप यादवने 3 षटकांच्या गोलंदाजीमध्ये 2 मेडन षटकांसह अवघ्या 6 धावांत 4 बळी घेतले. दुसरीकडे, रवींद्र जडेजाने 6 षटकांत 37 धावा देत 3 बळी घेतले. याशिवाय हार्दिक पांड्या, मुकेश कुमार आणि शार्दुल ठाकूर यांनीही 1-1 विकेट घेतली.

Tags

follow us