भारतीय संघ जुलैमध्ये वेस्ट इंडिजचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात टीम इंडिया कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) या दौऱ्यासाठी कसोटी आणि एकदिवसीय संघाची घोषणा केली आहे. या दौऱ्याची सुरुवात 12 जुलैपासून कसोटी सामन्याने होणार आहे. भारतीय कसोटी संघात उपकर्णधार म्हणून मोठा बदल करण्यात आला आहे. (ind-vs-wi-indian-test-squad-ajinkya-rahane-became-vice-captain-of-team-this-may-harmful-for-kl-rahul)
स्टार फलंदाज अजिंक्य रहाणेला भारतीय कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. रहाणेने नुकतेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातून संघात पुनरागमन केले आणि केवळ एका सामन्यानंतर त्याच्याकडे संघाचे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. रहाणे उपकर्णधार होताना पाहून संघाचा स्टार फलंदाज केएल राहुलला डच्चू मिळू शकतो, अशी अटकळ सुरू झाली आहे.
यापूर्वी केएल राहुल भारतीय संघाच्या कसोटी संघाचा उपकर्णधार होता. मात्र, सध्या राहुल दुखापतीतून सावरत असल्याने तो निवडीसाठी उपलब्ध नव्हता. पण त्याचवेळी, यावर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या दोन सामन्यांमध्ये खराब कामगिरीमुळे केएल राहुलला कसोटी संघातून वगळण्यात आले होते.
आता रहाणेच्या रूपाने संघात मोठा बदल झाला आहे. रहाणे डब्ल्यूटीसी फायनलद्वारे एका वर्षाहून अधिक कालावधीनंतर संघात परतला आणि आता त्याला कसोटी संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले आहे. रहाणे उपकर्णधार बनताच खराब फॉर्मशी झुंजत असलेल्या केएल राहुलला संघात स्थान मिळण्याचा धोका वाढला आहे.
वेस्टइंडीज दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा.. पाहा कोणाला संधी, कोणाला डच्चू?
आतापर्यंत रहाणे आणि राहुलची कसोटी कारकीर्द
रहाणेने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत 83 कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 142 डावांत फलंदाजी करताना त्याने 38.96 च्या सरासरीने 5066 धावा केल्या. यादरम्यान त्याने 12 शतके आणि 26 अर्धशतके केली आहेत. तर केएल राहुलने आतापर्यंत ४७ कसोटी सामने खेळले आहेत. या सामन्यांच्या 81 डावांमध्ये त्याने 33.44 च्या सरासरीने 2642 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 7 शतके आणि 13 अर्धशतके झळकावली आहेत.
कसोटी संघ:
रोहित शर्मा (C), अजिंक्य रहाणे (VC), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जैस्वाल, केएस भरत (WC), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मो. सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनाडकट, नवदीप सैनी.