India vs West Indies 1st T20 Score Update : वेस्ट इंडिजचा संघ ट्वेंटी-20 मध्ये काय कमाल करुन दाखवू शकतो याची प्रचिती आली आहे. ब्रेंडन किंग, रोव्हमन पॉवेल व निकोलस पूरन यांनी दमदार फटकेबाजी केली. वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली मात्र त्यानंतर भारताच्या गोलंदाजांनी या सामन्यात जोरदार कमबॅक केल्याचेही पाहायला मिळाले. वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 6 बाद 149 धावा केल्या. त्याचबरोबर भारतीय संघाला विजयासाठी 150 धावांचे लक्ष्य दिलं आहे.(indias bowlers strong comeback 150 runs target from West Indies)
वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. वेस्ट इंडिजचा कर्णधार रोवमन पॉवेलने यावेळी 32 बॉलमध्ये 48 रणांची खेळी केली. त्यानंतर मात्र भारतीय गोलंदाजांनी जोरदार कमबॅक करत युजवेंद्र चहल आणि अर्शदीपने दोन-दोन बळी घेतले. या सामन्यात वेस्ट इंडिजने इंडियन टीमसमोर 150 रणांचं लक्ष्य ठेवलं आहे.
राज्यातील सर्व शासकीय रुग्णालयात मिळणार मोफत उपचार, राज्य सरकारचा मोठा निर्णय
बेंडन किंगने इंडियन क्रिकेट टीमचं टेंशन वाढवलं होतं, मात्र त्यानंतर युझवेंद्र चहलने त्याच्या पहिल्याच षटकामध्ये ते कमी केलं. वनडे सामन्यात बाकावर बसून राहिलेल्या चहलने पहिल्या बॉलवर कायले मेयर्सला 1 आणि तिसऱ्या बॉलवर किंगला 28 पायचीत केलं.
चहलनंतर कुलदीपने यावेळी इंडियन टिमला तिसरं यश मिळवून दिलं. कुलदीपने यावेळी जॉन्सन चार्ल्सला तीन रणांवरच माघारी पाठवलं. त्यानंतर निकेल्स पुरन आणि कर्णधार रोवमन पॉवेल यांनी चांगल्या फटकेबाजीला सुरुवात केली. त्यानंतर हार्दिक पंड्याने आपल्या चौथ्या ओव्हरच्या पहिल्याच बॉलमध्ये पुरनला आऊट केले. पुरनने 34 बॉलमध्ये दोन चौकर आणि दोन शटकांच्या जोरावर 41 रणांची खेळी केली. पुरन बाद झाला आणि त्यानंतर पॉवेलने धडाकेबाज फटकेबाजी करायला सुरुवात केली. पॉवेलला साथ द्यायला यावेळी मैदानात होता.
इंडियन टिमकडून वेस्ट इंडिजच्या कर्णधाराला दोनवेळा जीवदान मिळालं. पॉवेल 18 रणांवर खेळत असताना कुलदीपच्या बॉलींगवर शुभमन गिलने त्याला जीवदान दिलं. त्यानंतरच्या हार्दिक पंड्याच्या षटकात युजवेंद्र चहलने पॉवेलला 20 धावांवर असताना जीवदान दिले.