IND vs ZIM : पाच टी20 मालिकेच्या पाचव्या आणि शेवटच्या सामन्यात भारतीय संघाने (Team India) जबरदस्त कामगिरी करत झिम्बाब्वेला 42 धावांनी पराभव करत पाच टी-20 सामन्यांची मालिका 4-1 ने जिंकली (IND vs ZIM) आहे. या मालिकेचा पहिला सामना गमवाल्यांतर भारतीय संघाने या मालिकेत जबरदस्त कामगिरी करत सलग चार सामने जिंकले आहे.
पाचव्या आणि शेवटच्या टी 20 सामन्यात झिम्बाब्वेचा कर्णधार सिकंदर रझाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सामन्यात भारतीय संघाने 20 षटकांत 6 गडी गमावून 167 धावा केल्या. मात्र संघाची सुरुवात खास झाली नाही. यशस्वी जैस्वाल पहिल्याच षटकात झेलबाद झाला त्याने 5 चेंडूत 12 धावा केल्या. तर चौथ्या षटकात अभिषेक शर्मा बाद झाला. त्याने 11 चेंडूत 14 धावांची खेळी खेळली.
तर पुन्हा एकदा कर्णधार शुभमन गिल या मालिकेत फ्लॉप ठरला. त्याने 14 चेंडूत 13 धावा केल्या. यानंतर संजू सॅमसनने रियान परागसह चौथ्या विकेटसाठी ६५ धावांची भागीदारी केली. रियान परागने 24 चेंडूत 22 आणि संजू सॅमसनने 45 चेंडूत 58 धावा केल्या. तुफानी खेळी खेळणारा शिवम दुबे धावबाद झाला. त्याने 12 चेंडूत 26 धावा केल्या. रिंकू सिंग 11 धावांवर आणि वॉशिंग्टन सुंदर 1 धावावर नाबाद राहिला. झिम्बाब्वेसाठी मुझाराबानीने 2 विकेट घेतले. तर कर्णधार सिकंदर रझा, रिचर्ड नगारावा आणि ब्रँडन मावुता यांनी 1-1 विकेट घेतला.
168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेची देखील सुरुवात खराब झाली. मुकेश कुमारने वेस्लीला बाद करून झिम्बाब्वेला पहिला धक्का दिला. ब्रायनला 8 चेंडूत केवळ 10 धावा करता आल्या.
संजय राऊतांच्या वक्तव्याने शरद पवारांचं टेन्शन वाढणार; श्रीगोंदा विधानसभेच्या जागेवर केला दावा
तर डायन मायर्स 32 चेंडूत 34 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. सिकंदर रझा 8 धावांवर धावबाद झाला आणि भारतीय संघाने या मालिकेचा पाचवा आणि शेवटचा सामना 42 धावांनी जिंकला.