Download App

इंग्लंड दौऱ्यासाठी भारत-अ संघ जाहीर, इशान किशनसह ‘या’ स्टार खेळाडूला संधी

Team India- A Squad :  बीसीसीआयने पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघाची (Team India A) घोषणा केली आहे. या संघात

Team India- A Squad :  बीसीसीआयने पुढील महिन्यात होणाऱ्या इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय अ संघाची (Team India A) घोषणा केली आहे. या संघात स्टार खेळाडू इशान किशनसह (Ishan Kishan) करुण नायरलाही (Karun Nair) स्थान देण्यात आले आहे. या संघाचा नेतृत्व अभिमन्यू ईश्वरन (Abhimanyu Easwaran) करणार आहे. भारतीय अ संघ इंग्लंड दौऱ्यावर इंग्लंड लायन्सविरुद्ध (England Lions) कॅन्टरबरी आणि नॉर्थम्प्टन येथे दोन प्रथम श्रेणी सामने खेळणार आहे. याच बरोबर 13 ते 16 जून दरम्यान बेकेनहॅम येथे भारतीय संघाबरोबर ‘इंट्रा-स्क्वॉड’ सामना देखील खेळणार आहे.

बीसीसीआयने भारतीय अ संघात नितीश कुमार रेड्डी, मुकेश कुमार आणि आकाश दीप यांनाही स्थान दिले आहे. याचबरोबर देशांतर्गत क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करणारा हर्ष दुबेही भारतीय अ संघात दिसणार आहे. तर या संघात यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव जुरेल देखील असणार आहे. तर दुसऱ्या सामन्यापूर्वी शुभमन गिल आणि साई सुदर्शन संघात सामील होणार आहे.  केंद्रीय करार मिळाल्यानंतर, इशान किशनची इंग्लंड दौऱ्यासाठी संघात निवड झाली आहे.

इंग्लंड लायन्सविरुद्ध पहिला सामना 30 मे रोजी कॅन्टरबरी येथे खेळवण्यात येणार आहे तर दुसरा सामना 6 जून रोजी नॉर्थम्प्टन येथे होणार आहे. तर यानंतर 13 ते 16 जून दरम्यान बेकेनहॅम येथे भारतीय संघाबरोबर ‘इंट्रा-स्क्वॉड’ सामना भारतीय अ संघ खेळणार आहे.

तर दुसरीकडे भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका 20 जूनपासून खेळणार आहे. या दौऱ्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. कर्णधार रोहित शर्माने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्याने या दौऱ्यात भारतीय संघाची कमान कोण सांभाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

भारतीय क्रिकेट विकसित करणाऱ्या प्रशासकांमध्ये पवार साहेबांचं नाव अग्रणी; CM फडणवीस वानखेडेवर स्पष्टच बोलले

भारत- अ संघ

अभिमन्यू ईश्वरन, यशस्वी जैस्वाल, करुण नायर, ध्रुव जुरैल, नितीश कुमार रेड्डी, शार्दुल ठाकूर, इशान किशन,मानव सुथार, तनुष कोटियन, मुकेश कुमार, आकाश दीप, हर्षित राणा, अंशुल कंबोज, खलील अहमद, रुतुराज गायकवाड, सर्फराज खान, तुषार देशपांडे, हर्ष दुबे

follow us