Download App

इंग्लंडला धक्का देण्याची तयारी, टीम इंडिया घेणार मोठा निर्णय, संघात एंट्री करणार ‘हा’ स्टार खेळाडू

Karun Nair : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघ (Team India) आता जुन महिन्यात इंग्लंडचा दौरा (England Tour) करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ

  • Written By: Last Updated:

Karun Nair : चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारतीय संघ (Team India) आता जुन महिन्यात इंग्लंडचा दौरा (England Tour) करणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघ पाच कसोटी (IND vs ENG 2025)सांमन्याची मालिका खेळणार आहे. तर दौऱ्याच्या तयारीसाठी भारत ‘अ’ (India A) इंग्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्यात वरिष्ठ संघातील खेळाडू देखील दिसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसरीकडे एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार बीसीसीआय (BCCI) भारत ‘अ’ च्या संघात रणजी आणि सय्यद मुश्ताक अली स्पर्धे शानदार कामगिरी करणारा करुण नायरला (Karun Nair) संधी देणार आहे. गेल्या काही दिवसांपासून करुण नायराला संघात संधी देण्यात यावी अशी मागणी होत होती.

भारत ‘अ’ इंग्लंड दौऱ्यावर  मे-जूनमध्ये दोन चार दिवसांचे सामने खेळणार आहे. ज्याची सुरुवात 30  मे रोजी होणार आहे. तर दुसरा चार दिवसीय सामना 6 जून रोजी नॉर्थम्प्टनच्या काउंटी ग्राउंडवर होणार आहे. तर पाच कसोटी मालिकेची सुरुवात 20 जूनपासून होणार आहे.  भारताने 2007 मध्ये इंग्लंडमध्ये शेवटची कसोटी मालिका जिंकली होती.

करुण नायरने 2024-25 च्या देशांतर्गत हंगामात शानदार कामगिरी केली आहे. करुण सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये सर्वाधिक धावा करणारा खेळाडू आहे. तर त्याने रणजी ट्रॉफीमध्ये 9 सामन्यांमध्ये 54 च्या सरासरीने 863 धावा केल्या. ज्यात 4 शतके आणि 2 अर्धशतके आहे. तर गेल्या वर्षी करुण इंग्लंडमधील काउंटी क्रिकेटमध्येही चमकला होता.  गेल्या वर्षी त्याने नॉर्थम्प्टनशायरसाठी द्विशतकही केले होते.

रोहित शर्मा कर्णधारपदाची जबाबदारी सांभाळणार

घरच्या मैदानात न्यूझीलंड विरुद्धची आणि ऑस्ट्रेलियात बॉर्डर – गावस्कर ट्रॉफी गमावल्यानंतर रोहित शर्मा (Rohit Sharma) कसोटीमध्ये कर्णधारपद सोडणार असल्याची चर्चा सुरु होती मात्र आता समोर आलेल्या माहितीनुसार, इंग्लंड दौऱ्यावर देखील रोहित शर्माच भारताीय संघाचा कर्णधार असणार आहे.

मोठी बातमी! अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन; तुरुंगातून येणार बाहेर

तर दुसरीकडे ऑस्ट्रेलिया दौऱ्यादरम्यान झालेल्या पाठीच्या दुखापतीतून सध्या सावरत असलेल्या जसप्रीत बुमराहच्या तंदुरुस्तीवर सर्वांचे लक्ष लागून आहे.

follow us