मोठी बातमी! अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन; तुरुंगातून येणार बाहेर

Pune News : पुण्यातील येरवडा परिसरात भररस्त्यात आलिशान कार थांबवून दारुच्या नशेत अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाला (Gaurav Ahuja) दिलासा मिळाला आहे. गौरव आहुजाला जामीन मिळाला असून तो उद्याच तुरुंगातून बाहेर येऊ शकतो. पुणे सत्र न्यायलयाने त्याला काही अटी शर्तींसह जामीन मंजूर केला आहे. या जामीनानंतर गौरव आहुजा आता 17 दिवसांंनंतर तुरुंगातून बाहेर येणार आहे.
पु्ण्यात 8 मार्च रोजी गौरव आहुजाने येरवडा परिसरात भररस्त्यात कार थांबवली. यानंतर लघुशंका केल्याचा तसेच कारमध्ये बसून अश्लील हावभाव केल्याचा त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावर संतप्त प्रतिक्रिया उमटल्या होत्या. या प्रकाराची दखल घेत पोलिसांनी देखील त्याच्यावर कारवाई केली होती. आता मात्र न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे उद्या तो तुरुंगातून बाहेर येण्याची शक्यता आहे.
अश्लील चाळे करणाऱ्या गौरव आहुजाचा येरवडातील मुक्काम वाढला; जामिनावर 20 मार्चला सुनावणी होणार
नेमकं काय घडलं?
शास्त्रीनगर भागात घडलेली घटना 8 मार्च रोजी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली होती. व्हायरल व्हिडिओतील मुलाची ओळख गौरव अहुजा अशी झाली होती. गौरव आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात होता. घटनेवेळी मद्यधुंद असलेल्या चालकाला लघुशंका करताना नागरिकांनी अडवले. त्यानंतर सबंधित युवकाने गाडीत बसल्यानंतर अडवणाऱ्या व्यक्तीला अश्लील हावभाव केले आणि भरधाव वेगात गाडी पुढे नेली. सदर चालक आणि त्याचा मित्र दोघेही बीएमडब्ल्यू गाडीतून वाघोलीच्या दिशेने वेगवान गतीने जात होते असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. स्थानिकांनी या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना सादर केले. ज्यामुळे चौकशी होऊन गौरव आहुजाला ताब्यात घेण्यात आले होते.
पोलिसांनी शहरातील पंचतारांकीत हॉटेलमधील एका पबमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी मिळवले. घटना घडण्याच्या आधी गौरव आहुजा ज्या पबमध्ये गेला होता तेथील फुटेज पोलिसांनी मिळवले होते. मुंढवा रोडवरील एका रेस्टॉरंटमध्ये गौरव आहुजा होता. त्याच्यासोबत त्याचा एक मित्र देखील होता. गौरव आहुजा हा मित्रासोबत त्या पबमध्ये गेल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; येरवडामध्ये होणार रवानगी