अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; येरवडामध्ये होणार रवानगी

अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; येरवडामध्ये होणार रवानगी

Gaurav Ahuja 14-day judicial custody will sent to Yerwada jail : विद्येचे माहेर घर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळख असणाऱ्या पुण्यात एका श्रीमंत बापाच्या पोरानं भररस्त्यात लघुशंका करत अश्लील कृत्य केल्याचे समोर आले होते. त्यानंतर त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर आता या मुलाला अगोदर एक दिवसाची पोलीस कोठडी तर आता त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध दाखल होणार गुन्हा, ‘त्या’ प्रकरणात कोर्टाचे दिल्ली पोलिसांना आदेश

त्यानंतर गौरव अहुजाची रवानगी येरवडा जेलमध्ये होणार आहे. दुसरीकडे गौरव आहुजाला जमीन मिळावा यासाठी त्याच्या वकिलाने न्यायालयाकडे जमीन अर्ज दाखल केला आहे. त्याच्या या जमीन अर्जावर उद्या दुपारी सुनावणी होणार आहे. तर आज झालेल्या सुनावणीत सरकारी वकीलांकडून करण्यात आलेल्या युक्तीवादामध्ये सांगण्यात आलं की, गाडी जप्त करण्यात आलीय.

बंडखोर BLA समोर पाकिस्तानी सैन्याचं आत्मसमर्पण; ‘त्या’ 6000 लष्कराची संपूर्ण कुंडली, एका क्लिकवर…

तिची तपासणी करायची आहे. अमली पदार्थ घेतले होते का? याबाबत तपास करायचा आहे. या आरोपीने गाडी कोल्हापूरमध्ये गाडी लावली होती. तो कर्नाटकला जाणार होता. त्याबाबतचा तपास करायचा आहे. त्याने गाडी लावली तिथलं cctv घ्यायचे आहेत. त्यामुळे आरोपीला पोलीस कोठडी मिळावी. अशी मागणी करण्यात आली होती. मात्र त्याला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

Video : पुण्यात तरूणाईचं चाललंय तरी काय? आईने नशा करण्यास पैसे न दिल्याने जाळल्या 13 दुचाकी

तर यावर आरोपीचे वकिलांनी म्हटलं की, गौरवची BMW काल जप्त केली आहे. तेव्हाच अमली पदार्थबाबत चौकशी का केली नाही? विनाकारण वेगवेगळी कारण सांगून पोलीस कोठडी मागितली जातेय. हा तपास करण्यासाठी आरोपीची गरज नाही. आरोपीची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आलीय. आम्ही जामनासाठी अर्ज केला आहे. उद्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

नेमकं काय घडलं?

शास्त्री नगर भागात घडलेली घटना शनिवारी सकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली असून, व्हायरल व्हिडिओतील मुलाची ओळख पटली असून त्याचे नाव गौरव अहुजा असे आहे. गौरव आणि त्याच्यासोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. घटनेवेळी मद्यधुंद असलेल्या चालकाला लघुशंका करताना नागरिकांनी अडवले. त्यानंतर सबंधित युवकाने गाडीत बसल्यानंतर अडवणाऱ्या व्यक्तीला अश्लील हावभाव केले आणि भरधाव वेगात गाडी पुढे नेली. सदर चालक आणि त्याचा मित्र दोघेही बीएमडब्ल्यू गाडीतून वाघोलीच्या दिशेने वेगवान गतीने गाडी जात होते असे जाधव म्हणाले. स्थानिकांनी या घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग पोलिसांना सादर केले आहे, ज्यामुळे चौकशी सुलभ होण्याची शक्यता आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube