माजोरडा गौरव अन् त्याचा साथीदार पुणे पोलिसांच्या ताब्यात; वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाई होणार

माजोरडा गौरव अन् त्याचा साथीदार पुणे पोलिसांच्या ताब्यात; वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कारवाई होणार

Pune Crime News :  पुण्यात एका तरुणाने रस्त्यावर लघुशंका करत अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली. या घटनेनंतर पुणेकर हादरले आहेत. गौरव आहुजा असं या प्रकरणातील आरोपीचं नाव आहे. (Pune) पुण्यात नंगानाच करणाऱ्या या तरुणाला आता पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. यानंतर गौरव अहुजाने माफी मागितली. मी चुकलो, मला एक संधी द्या, असं गौरव आहुजाने म्हटले आहे. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Video : पुण्यात भररस्त्यात अश्लील कृत्य करणाऱ्या गौरव आहुजाचा माज उतरला, हात जोडून म्हणाला माफ करा

मिळालेल्या माहितीनुसार, गौरव आहुजाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. गौरव आहुजासोबत असलेला त्याचा मित्र भाग्येश ओसवाला याला येरवडा पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर गौरव आहुजासह त्याचा मित्र भाग्येश ओसवाला यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. आता या वैद्यकीय चाचणीत धक्कादायक माहिती उघड झाली आहे. भाग्येश ओसवाल हा गौरवसोबत बीएमडब्ल्यू कारमध्ये बसून दारु पीत होता.

अहवालात नक्की काय?

भाग्येश ओसवालचा मेडिकल रिपोर्ट पोलिसांच्या हाती लागला आहे. भाग्येश ओसवालच्या मेडिकलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळलं. तर गौरव आहुजाचा मेडिकल रिपोर्ट येणे अद्याप बाकी आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गौरव आहुजाच्या मेडिकल रिपोर्टमध्येही अल्कोहोलंच प्रमाण आढळल्याचे बोललं जात आहे. गौरवची कराडमध्ये मेडिकल चाचणी करण्यात आली. त्यात अल्कोहोलचं प्रमाण आढळले आहे.

प्रकरण काय?

पुण्यात कायदा सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. पुण्यात काल सकाळच्या वेळेला BMW कारमध्ये मद्यधुंद अवस्थेत असलेला गौरव आहुजा याने रस्त्यावरच अश्लील चाळे केल्याची घटना समोर आली होती. गौरवसोबत त्याचा मित्र भाग्येश ओसवाला हा देखील कारमध्ये होता. येरवडा परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला. या तरुणाने रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या महिलांसोर अश्लिल चाळे केले. यानंतर त्या तरुणाने सिग्नलवर लघुशंका केली. या गाडीत बसलेला तरुण मद्य प्राशन केलेल्या अवस्थेत होता. येरवडा भागांमध्ये शास्त्रीनगर चौकात स्त्रियांच्या समोर त्याने अश्लील चाळे केले. हे दोघेही तरुण दारु प्यालेले होते. अश्लील चाळे करुन झाल्यावर दोघे फुल स्पीडमध्ये गाडी चालवत वाघोलीच्या दिशेने गेले. या कारचा नंबर MH-12 RF8419 आहे. त्यामुळे पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

घटनाक्रम काय घडला

रात्री गौरव आहुजा याला कराड पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यानंतर पुणे पोलिसांच्या हवाली केलं सकाळी गौरव आहुजा याला ससून रुग्णालयात आणून त्याची वैद्यकीय तपासणी केली. गौरव आहुजाचा मेडिकल रिपोर्ट येणे बाकी आहे. गौरव आहूजा बरोबर असलेला त्याचा मित्र भाग्येश ओसवाला येरवडा पोलिसांनी अटक केलीय. बीएमडब्ल्यूमध्ये बसून पीत होता. त्यासोबत असलेला भाग्येश ओसवालचा मेडिकल रिपोर्ट पोलिसांच्या हाती आला. भाग्येश ओसवालच्या मेडिकलमध्ये अल्कोहोलचे प्रमाण आढळलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube