रोहित-कोहलीचा ‘दिवाळी धमाका’ ! तिसऱ्या वनडेत ऑस्ट्रेलिया हरविले, कोहलीच्या नावावर मोठा विक्रम

Rohit Sharma तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला तब्बल नऊ विकेट्ने पराभव केलाय. रोहित शर्माने शानदार शतक झळकविले.

India beat Australia by 9 wickets Rohit Sharma Virat Kohliः

India beat Australia by 9 wickets Rohit Sharma Virat Kohliः

India vs Australia: तिसऱ्या वनडेमध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला तब्बल नऊ विकेट्ने पराभव केलाय. रोहित शर्माने शानदार शतक झळकवत 121 धावांची नाबाद खेळी केली. पहिल्या दोन सामन्यात विराट आणि रोहित शर्मा (Rohit Sharma) अपयशी ठरले होते. परंतु तिसऱ्या सामन्यात विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माने दिवाळी धमाका केला. या दोघांनी मोठी भागिदारी केली. ही मालिका ऑस्ट्रेलियाने 2-1ने जिंकलीय.

हर्षित राणाच्या शानदार गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियाचा संघ पूर्ण षटके खेळू शकला नाही. ऑस्ट्रेलियाचा संघ 46.4 षटकात 236 धावांत गारद झाला. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली (74 धावा) यांच्या नाबाद शतकीय भागिदारीच्या जोरावर टीम इंडियाने 39 षटकांत सामना जिंकला. (India beat Australia by 9 wickets Rohit Sharma Virat Kohliः


रोहित शर्मा आणि विराट कोहलीमध्ये 168 धावांची भागिदारी

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 237 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताला पहिला झटका 69 धावांवर बसला. जोश हेजलवूडने कर्णधार शुभमन गिलला बाद केले. त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने 168 धावांची भागिदारी केली. तर रोहित शर्माने 125 चेंडूत 13 चौकार आणि तीन षटकार मारत 121 धावा काढल्या. तर विराट कोहलीने 81 चेंडूत 74 धावा केल्या. त्यात त्याने सात चौकार मारले.


हर्षित राणाने ऑस्ट्रेलियाला रोखले

नाणेफेक जिंकू प्रथम फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलिया संघ 236 धावाच करू शकला. हर्षित राणाने सर्वाधिक चार आणि वॉशिंग्टन सुंदरने दोन विकेट घेतल्या. ऑस्ट्रेलियाकडून मॅट रेनशॉने अर्धशतक झळकविले.


वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणारा कोहली दुसरा खेळाडू

विराट कोहली वनडेमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या दुसरा खेळाडू ठरला आहे. त्याने श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू कुमार संगकाराचे रेकॉर्ड मोडले. तर सचिन तेंडुलकरच्या नावावर वनडे सर्वाधिक 18,426 धावांचा विक्रम आहे. संगकाराने 14,234 धावा केल्या आहेत. संगकाराने 404 सामन्यामध्ये हा विक्रम रचला आहे. तर कोहलीने 305 सामन्यात हा विक्रम केलाय. सचिनने 463 सामन्यात 18426 धावा केल्या आहेत. सचिनच्या नावावर वनडेत 49 शतक आहे. तर विराट कोहलीने 305 सामन्यात 14,250 धावा केल्या आहेत. कोहलीने वनडेमध्ये 51 शतके झळकविली आहेत.

Exit mobile version