Champions Trophy 2025 : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असणारी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) अखेर हायब्रिड मोडलवर (Hybrid Model) होणार आहे. यासाठी पीसीबी (PCB) आणि बीसीसीआयमध्ये (BCCI) एकमत झाले आहे. तर आता या स्पर्धेत भारत- पाकिस्तान (India Vs Pakistan) सामना कधी आणि किती वाजता होणार याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
समोर आलेल्या अपडेटनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा सामना दुबई किंवा श्रीलंकेमध्ये (Sri Lanka) होऊ शकते. या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 19 फेब्रुवारीला भारत – पाकिस्तान सामना होणार असल्याची माहिती समोर येत आहे. जर हा सामना श्रीलंकेत झाला तर भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल आणि जर हा सामना दुबईत झाला तर भारतीय वेळेनुसार दुपारी 2.30 वाजता हा सामना सुरु होईल.
माहितीनुसार पीसीबी पुढील 24 तासांत भारतासाठी वेळापत्रक जाहीर करणार आहे. माहितीनुसार भारताचे सामने दुबईत (UAE) होण्याची शक्यता जास्त आहे पण चर्चांनुसार भारताचे सामने श्रीलंकेत देखील होऊ शकतात. बीसीसीआयने सुरक्षेचा कारण देत पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीबद्दल काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होते. गेल्या काही दिवसांपासून बीसीसीआय आणि पीसीबी एकमतावर तयार होत नसल्याने चॅम्पियन्स ट्रॉफी रद्द होणार असल्याचा दावा देखील काही मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात येत होता मात्र आता आयसीसीने मोठा निर्णय घेत चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 हायब्रिड मोडलवर होणार असल्याची घोषणा केली आहे.
‘त्या’ अर्बन नक्षली संघटनांची यादी द्या, नाना पटोलेंची मुख्यमंत्री फडणवीसांकडे मागणी
या स्पर्धेसाठी लवकरच वेळापत्राकाची घोषणा करण्यात येणार आहे. तर भारताव्यतिरिक्त इतर संघाचे सामने पाकिस्तानमधील लाहोर आणि कराचीमध्ये आयोजित करण्यात येणार असल्याची देखील माहिती समोर आली आहे.