मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद मिटला, ICC ने मान्य केली पाकिस्तानची ‘ही’ अट

मोठी बातमी! चॅम्पियन्स ट्रॉफीचा वाद मिटला, ICC ने मान्य केली पाकिस्तानची ‘ही’ अट

Champions Trophy 2025 : पुढील वर्षी पाकिस्तानात होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीवरून (Champions Trophy 2025) भारत आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डात वाद (Pakistan Cricket Board) सुरू होता. पण आता या वादावर तोडगा निघाला आहे. या स्पर्धांचं यजमानपद पाकिस्तानकडेच राहणार आहे. पण भारतीय संघ पाकिस्तानात (Team India) पाठवण्यास सरकारने नकार दिला होता. तेव्हापासूनच आयसीसी दोन्ही बोर्डात संवाद घडवून आणण्याच्या प्रयत्नात होते. अशात आता चॅम्पियन्स ट्रॉफी कधी आणि कुठे होणार याचं उत्तर मिळालं आहे.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार ही स्पर्धा हायब्रीड पद्धतीने आयोजित करण्यावर सहमती बनली आहे. यानुसार टीम इंडिया आपले सामने दुबईत खेळणार आहे. आयसीसीच्या सूत्रानुसार दुबईत आयसीसीचे चेअरमन जय शाह आणि पाकिस्तान मंडळ यांच्यातील एक बैठकीत या निर्णयाला अंतिम रूप देण्यात आले. आयसीसी सूत्रांनी पीटीआयला सांगितले की 2025 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तान आणि दुबईत आयोजित करण्यावर सर्व पक्षांनी सहमती दर्शवली आहे. या स्पर्धेतील भारताचे सामने दुबईत होणार आहेत.

ICC कडून पाकिस्तानची अट मान्य

पाकिस्तानने हा निर्णय मान्य करताना काही अटी ठेवल्या होत्या. यातील एक अट आयसीसीने मान्य केली आहे. सन 2027 पर्यंत आयसीसी स्पर्धांमध्ये हायब्रीड पद्धतचा अवलंब केला जाईल. या काळात महिला एकदिवसीय विश्व चषक आणि टी 20 वर्ल्डकप स्पर्धांचे आयोजन भारताकडून केले जाणार आहे. जरी हायब्रीड पद्धत अमलात आणली नसती तरी पाकिस्तान संघाला भारतात येण्यासाठी बाध्य करता येणे शक्य नव्हते.

Champions Trophy : भारताने नकार देताच पाकिस्तानचा नवा फॉर्म्यूला; BCCI मंजूर करणार?

पाकिस्तान बोर्डाने या बैठकीत 2031 पर्यंत या व्यवस्थेची मागणी केली होती परंतु आयसीसीने 2027 पर्यंत आपल्या सर्व स्पर्धांसाठी हायब्रीड मॉडेल अवलंबण्यात सहमती दर्शवली आहे. आयसीसी मधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 2026 मधील पुरुष टी 20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान संघ त्यांचे सामने श्रीलंकेत खेळणार आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये हायब्रीड मॉडेल अवलंबण्यात येणार असल्याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे आर्थिक नुकसान होणार आहे तेव्हा मोबदल्याची मागणी बोर्डाने केली आहे. त्यांच्या या मागणीवर आयसीसी कडून विचार केला जात आहे. अशात आता आयसीसी या स्पर्धेच्या वेळापत्रकाला अंतिम रूप देण्याचा प्रयत्न करणार आहे जेणेकरून वेळापत्रकाची घोषणा करता येईल.

IND vs PAK Hockey: चक दे इंडिया! आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानचा 2-1 धुव्वा 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube