India vs Bangladesh Live : भारत विरुद्ध बांगलादेशमध्ये (IND VS BAN) सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताचा स्टार खेळाडू रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin) दिग्गज गोलंदाज अनिल कुंबळेचा (Anil Kumble) मोठा विक्रम आहे. पहिल्या दिवशी उपाहारानंतर रविचंद्रन अश्विनने भारताला तिसरे यश मिळवून दिले आणि याचबरोबर अश्विन आशिया खंडातील कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा दुसरा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर होता. एवढेच नाही तर तो आशिया खंडात सर्वाधिक कसोटी बळी घेणारा भारतीय बनला आहे.
दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आहे. पावसामुळे पहिल्या दिवसात फक्त 35 षटकांचा खेळ झाला. या दरम्यान बांगलादेशने 3 विकेट गमावून 107 धावा केले असून भारतातर्फे आकाश दीपने 2 तर अश्विनने एक विकेट घेतला आहे.
पहिल्या कसोटीत अप्रतिम कामगिरी
तर दुसरीकडे या मालिकेच्या पहिल्या सामन्यात पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला. या सामन्यात गोलंदाजीसोबतच अश्विनने फलंदाजीतही अप्रतिम कामगिरी केली. त्याला सामनावीर म्हणून निवडण्यात आले. अश्विनने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले होते. भारतीय अष्टपैलू खेळाडूने 133 चेंडूत 113 धावांची खेळी केली होती. यादरम्यान त्याने 11 चौकार आणि 2 षटकार मारले. अश्विनने बांगलादेशच्या दुसऱ्या डावात अश्विनने 21 षटकांत 6 बळी घेतले.
आशियामध्ये सर्वाधिक कसोटी विकेट घेणारा गोलंदाज
भारतीय अश्विनने आशिया खंडात आतापर्यंत कसोटीत 420 बळी घेतले आहेत तर अनिल कुंबळेने आशिया खंडात कसोटीत 419 विकेट घेतल्या होत्या. मुथय्या मुरलीधरन हा आशिया खंडात कसोटीत सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज आहे. त्याने 612 विकेट घेतले आहे. या यादीत रंगना हेराथ चौथ्या आणि हरभजन सिंग पाचव्या स्थानावर आहे.
आशियातील सर्वाधिक कसोटी विकेट
मुथय्या मुरलीधरन- 612 विकेट्स
आर अश्विन- 420* विकेट्स
अनिल कुंबळे- 419 विकेट्स
रंगना हेरथ- 354 विकेट्स
पारनेरचा आमदार शिवसेनेचा होणार…, पठारेंनी विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले!
हरभजन सिंग- 300 विकेट्स