मोठी बातमी! टीम इंडियाचा बांग्लादेश दौरा अखेर स्थगित; बैठकीत नेमकं काय ठरलं?

मोठी बातमी! टीम इंडियाचा बांग्लादेश दौरा अखेर स्थगित; बैठकीत नेमकं काय ठरलं?

IND vs BAN Cricket Series Postponed : बांग्लादेशातील अराजकतेची स्थिती आणि हिंसक (IND vs BAN) वातावरण पाहता बीसीसीआयने टीम इंडियाचा  (Team India Tour of Bangladesh) बांग्लादेश दौरा अखेर स्थगित केला आहे. भारतीय संघ (India vs Bangladesh) ऑगस्ट महिन्यात बांग्लादेश दौरा करणार होता. परंतु आता वनडे आणि टी 20 सामन्यांची ही मालिका 13 महिन्यांसाठी स्थगित करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आज याबाबत घोषणा केली. बांग्लादेश क्रिकेट बोर्डाला (Bangladesh Cricket Board) सोबत घेत हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

दौरा टाळण्याचं कारण काय

बीसीसीआयने शनिवारी एक प्रेसनोट प्रसिद्धीस दिली. दोन्ही क्रिकेट बोर्डांनी सहमतीने हा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांसाठी भारतीय संघ बांग्लादेशचा दौरा करणार होता. परंतु, आता ही मालिका सप्टेंबर 2026 मध्ये आयोजित केली जाणार आहे. दोन्ही क्रिकेट संघांच्या आंतरराष्ट्रीय शेड्यूलचे कारण ही मालिका स्थगित करण्यामागे देण्यात आले आहे. परंतु, बांग्लादेशातील सध्याची परिस्थिती खेळाडूंच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून योग्य नाही याच कारणामुळे दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचीही चर्चा सुरू आहे. आता ही मालिका कधी आयोजित केली जाईल याचे वेळापत्रक योग्य वेळी जाहीर केले जाईल असे या निवेदनात म्हटले आहे.

BCCI बांग्लादेशला देणार दणका! टीम इंडियाचा नियोजित दौरा टळण्याची चिन्हे; काय घडलं?

खरंतर दोन्ही देशांतील ही मालिका स्थगित किंवा रद्द होईल अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. भारत आणि बांग्लादेश (India Bangladesh Tension) यांच्यातील सध्याची तणावाची स्थिती पाहता असाच निर्णय होईल अशीही चर्चा होती. मागील वर्षी बांग्लादेशात सत्तांतर झाले होते. हिंसक आंदोलनाच्या माध्यमातून शेख हसीना यांचे सरकार हटवण्यात आले. अल्पसंख्यांक हिंदूवरील हल्ले वाढले. तेथील नेत्यांच्या भारतविरोधी वक्तव्यांमुळे संघर्षाची स्थिती कायम होती. त्यामुळे टीम इंडियाचा बांग्लादेश दौरा अनिश्चिततेत सापडला होता.

या दौऱ्याच्या वेळापत्रकानुसार भारतीय संघ 17 ऑगस्टपासून (Team India) ढाकात तीन वनडे आणि तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार होता. हा दौरा रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली यांच्या (Virat Kohli) वनडे क्रिकेटमधील वापसीच्या दृष्टीनेही खास होता. कारण या दोघांनीही कसोटी आणि टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे.

ICC Test Rankings : जसप्रित बुमराह अव्वल! कसोटी गोलंदाजीत किती भारतीय? वाचा यादी..

follow us
  • fb
  • instagram
  • youtube