ICC Test Rankings : जसप्रित बुमराह अव्वल! कसोटी गोलंदाजीत किती भारतीय? वाचा यादी..

ICC Test Bowling Rankings : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने कसोटी क्रिकेटमधील (ICC Test Bowling Rankings) वेगवान गोलंदाजांची ताजी यादी जाहीर केली आहे. या यादीत भारतीय गोलंदाज जसप्रित बुमराहने पहिला (Jasprit Bumrah) क्रमांक पटकावला आहे. पहिल्या पाच गोलंदाजांच्या यादीत बुमराह एकटा भारतीय गोलंदाज आहे. ऑस्ट्रेलियाचे दोन गोलंदाज आहेत. दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानचा एक-एक (Pakistan) गोलंदाज आहे. यंदा रँकिंग्समध्ये फक्त एकच बदल झाला आहे.
ICC टेस्ट रँकिंग्समधील गोलंदाज
जसप्रित बुमराह क्रिकेट जगतातील दर्जेदार (Indian Cricket Team) गोलंदाज आहे. बुमराह सध्या 907 रेटिंग्स मिळवत पहिल्या क्रमांकावर आहे. बुमराहने अलीकडे झालेल्या बॉर्डर-गावस्कर स्पर्धेत ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 सामन्यांत 32 विकेट्स घेतल्या (IND vs AUS) होत्या. यानंतर इंग्लंड विरुद्धच्या मालिकेत पहिल्या सामन्यात पाच विकेट्स घेतल्या.
Jasprit Bumarh : टीम इंडियाला डबल धक्का! पराभवानंतर बुमराहवर ‘या’ प्रकरणात कारवाई ?
कागिसो रबाडा या (Kagiso Rabada) यादीत 859 गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. रबाडाने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपमध्ये ऑस्ट्रेलिया (World Test Championship ) विरुद्धच्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली होती. त्याच्या या कामगिरीच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने (South Africa) या सामन्यात विजय मिळवला होता. या अंतिम सामन्यात रबाडाने एकूण 9 विकेट्स घेतल्या होत्या.
पॅट कमिन्स 846 गुणांसह (Pat Cummins) या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. कमिन्सने भारताविरुद्धच्या (Border Gavaskar Trophy) बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीत 25 विकेट्स घेतल्या होत्या. तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या (AUS vs SA) फायनल सामन्यात सात विकेट्स घेतल्या होत्या.
जोश हेजलवूडने वेस्टइंडिज विरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत चांगली गोलंदाजी केली आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने सात विकेट्स घेतल्या. यामुळे त्याला एका अंकाचा फायदा झाला. हेजलवूड 817 गुणांसह या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानी गोलंदाज नोमान अली या यादीत पाचव्या क्रमांकावर आहे. त्याला एकूण 806 गुण मिळाले आहेत.
Team India : सुदर्शन-अर्शदीपची एन्ट्री, नायर-ठाकूरचे पुनरागमन; सिलेक्शनमधील ५ मोठ्या गोष्टी