टीम इंडियाचा पराक्रम! पहिल्याच कसोटीत बांग्लादेशचा दणदणीत पराभव; अश्विन चमकला

टीम इंडियाचा पराक्रम! पहिल्याच कसोटीत बांग्लादेशचा दणदणीत पराभव; अश्विन चमकला

IND vs BAN Test Match : चेन्नई कसोटीत टीम इंडियाने बांग्लादेशचा 280 धावांनी पराभव करत (IND vs BAN Test Match) शानदार विजय मिळवला. लोकल ब्वॉय आर. अश्विनने (R. Ashwin) चमकदार कामगिरी केली. फलंदाजीत शतक तर केलेच शिवाय फिरकीत कमाल दाखवत सहा विकेट्स घेतल्या. भारताने पहिल्या डावात 376 धावा केल्या होत्या. दुसरा डाव 287 धावांवर घोषित करण्यात आला होता. यानंतर सामना जिंकण्यासाठी बांग्लादेशला 515 धावांचे (Bangladesh) आव्हान मिळाले होते. या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशचा संघ चौथ्या दिवसाच्या जेवणाच्या वेळेआधीच 234 धावांवर ऑलआउट झाला. बांग्लादेशच्या आजच्या डावाची सुरुवात 158 धावांपासून केली होती. पुढे फक्त 74 धावांत बांग्लादेशच्या सहा विकेट पडल्या.

बांग्लादेश विरुद्ध नवं रेकॉर्ड

कोणत्याही संघाविरुद्ध भारताचा हा सलग सहावा कसोटी विजय आहे. मालिकेतील दुसरा सामना 27 सप्टेंबरपासून कानपूर येथे सुरू होणार आहे. या मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे. यानंतर भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा होणार आहे. येथे बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी आयोजित करण्यात आली आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने भारतीय संघाचा हा दौरा अतिशय महत्वाचा मानला जात आहे.

पराभूत सामन्यांतील हिट फलंदाज; सचिननंतर टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूचा नंबर

634 दिवसानंतर पंतचं दमदार कमबॅक

सन 2022 मध्ये बांग्लादेश विरुद्ध कसोटी सामना खेळल्याच्या पाच दिवसांनंतर कार अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला होता. यानंतर पंत बराच काळ संघाबाहेर राहिला. त्याच्या गैरहजेरीत संघ व्यवस्थापनाने विकेटकीपर म्हणून चार खेळाडूंना संधी दिली. यानंतर संघात वापसी केलेल्या पंतने या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली. पंतने दुसऱ्या डावात 128 चेंडूत 13 चौकार आणि चार षटकारांच्या आतषबाजी करत 109 धावा केल्या.

अश्विनच्या फिरकीची कमाल

भारताच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांग्लादेशच्या फलंदाजांना सूर गवसला नाही. यातही सुरुवातीला भारताच्या अडचणी वाढल्या होत्या. वेगवान गोलंदाजांनी खेळपट्टीकडून मदत मिळत नव्हती. त्यामुळे बांग्लादेशच्या फलंदाजांनी वेगाने धावा करण्यास सुरुवात केली. यानंतर फिरकी गोलंदाज अश्विनला संधी देण्यात आली. अश्विनने धारदार गोलंदाजी करत सहा विकेट्स घेतल्या.

रोहित-विराट फ्लॉप, गिलचं शतक

या सामन्यातील दोन्ही डावांत कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) अपयशी ठरले. रोहितने फक्त सहा आणि विराटने 17 धावा केल्या. दुसऱ्या डावात शुभमन गिलने (Shubman Gill) मात्र शानदार खेळ करत त्याच्या टेस्ट करियरमधले पाचवे शतक झळकावले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube