Download App

IND vs ENG : बीसीसीआयने वजनावरून हिणवलेला सर्फराज अखेर टीम इंडियात ! संघात दोन मोठे बदलही

  • Written By: Last Updated:

India vs England Test Series : पहिल्या कसोटीत इंग्लंडकडून (England ) पराभवाचा झटका बसल्यानंतर टीम इंडियात (India) तीन मोठे बदल करण्यात आलेत. तीन नव्या खेळाडूंना संघात प्रवेश देण्यात आलाय. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा फलंदाज सर्फराज खानला (Sarfaraz Khan) संघात स्थान मिळाले आहे. तो मुंबईतील खेळाडू आहे. त्याला अनेकदा डावलण्यात आले होते. त्यावरून निवड समितीवर टीका झाली होती. तर सर्फराज खानने आधी वजन कमी करावे व वागणे सुधारावे, असा सल्ला बीसीसीआयने (BCCI) काय दिवसांपूर्वी दिला होता. पण आता त्याच्या चांगल्या कामगिरीमुळे त्याला इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीसाठी संघात स्थान मिळाले आहे.सर्फराजबरोबर वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमारचाही संघात प्रवेश झाला आहे.

रोहित पवार यांचा गुलाबराव पाटील यांच्याविरोधात 100 कोटींचा अब्रुनुकसानीचा दावा

26 वर्षीय सर्फराज खानचे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगले रेकॉर्ड आहे. 45 सामन्यात 66 डावांत त्याने 70 च्या सरासरीने 3 हजार 912 धावा केल्या आहेत. त्यात 14 शतके आणि 11 अर्धशतके झळकाविली आहेत. त्याने नाबाद 301 धावांची खेळी केली आहे. मुंबई संघासाठी तो खेळतो.

मराठा आरक्षणावर नाराज झालेल्या छगन भुजबळांची सरकार समजूत काढणार…


रवींद्र जडेजा आणि केएल राहुल संघाबाहेर

रवींद्र जडेजा, केएल राहुल हे दुसऱ्या कसोटीतून बाहेर झाले आहेत. या दोघांचा जागी तीन खेळाडू संघात सहभागी करून घेण्यात आले आहे. फिरकीपटू वॉशिंग्टन सुंदरचाही संघात प्रवेश झाला आहे. तो भारतासाठी सहा कसोटी सामने खेळला आहे. फिरकीपटू सौरभ कुमारला संघात सहभागी झाला आहे. तो पूर्वीही भारतीय संघात होता. परंतु तो सामन्यात खेळलेला नाही. अवेश खानचाही संघात समावेश करण्यात आले आहे. तो सध्या मध्य प्रदेशकडून रणजी ट्रॉफीत खेळत आहे. गरज पडल्यास तो कसोटी सामना खेळेल.

इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.

follow us

वेब स्टोरीज