India vs Pakistan Champions Trophy 2025 : 2025 चॅम्पियन्स ट्रॉफीमधील सर्वात मोठा सामना रविवार 23 फेब्रुवारी रोजी खेळला जाणार (Cricket News) आहे. रविवारी भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) आमनेसामने असणार आहेत. हा शानदार सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. पाकिस्तानसाठी (Champions Trophy 2025) हा सामना एखाद्या नॉकआउट सामन्यापेक्षा कमी नाही.
भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील सामना पाहू शकता. या विशेष सामन्याचा टॉस दुपारी 2 वाजता होईल. 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये दोन्ही संघांचा हा दुसरा सामना असेल. भारताने पहिल्या सामन्यात बांग्लादेशला हरवलंय. तर पाकिस्तानला न्यूझीलंडकडून दारुण पराभव स्वीकारावा लागला.
जर पाकिस्तान संघाने हा सामना गमावला, तर त्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत पोहोचणे जवळजवळ अशक्य होईल. या कारणास्तव, हा सामना पाकिस्तानसाठी नॉकआउट सामन्यासारखा आहे. कोणत्याही देशाच्या संघासाठी बलाढ्य भारतीय संघाला हरवणं सोपं असणार नाही. भारतीय संघाने पहिल्याच सामन्यात आपली ताकद दाखवून दिलीय.
2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी , सॅम अयुबला संघातून वगळण्यात आल्यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला. पहिल्या सामन्यातील पराभवानंतर आता पाकिस्तानी संघाला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. स्टार सलामीवीर फखर झमानलाही स्पर्धेतून बाहेर करण्यात आले आहे. फखरच्या जागी इमाम उल हकला संघात संधी मिळाली आहे.
VIDEO : ‘माझ्या मराठीची बोलू कौतुके, मराठी अमृताहून गोड’…दिल्लीत PM मोदींचं मराठीत भाषण
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात दुखापत झालेला फखर झमान स्पर्धेतून बाहेर पडलाय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने त्याच्या जागी इमाम उल हकचे नाव जाहीर केले आहे. इमाम हा पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम-उल-हकचा पुतण्या आहे. मोबाईलवर जिओस्टार, स्टार स्पोर्ट्स नेटवर्क चॅनेलवर टीव्हीवर एकूण 9 भाषांमध्ये हा सामना पाहता येणार आहे.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, केएल राहुल, ऋषभ पंत, शुभमन गिल, विराट कोहली, हार्दिक पंड्या, अर्शदीप सिंग, मोहम्मद शमी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वरुण चक्रवर्ती, हर्षित राणा.
ICC चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी पाकिस्तान संघ : कामरान गुलाम, सौद शकील, तय्यब ताहिर, बाबर आझम, फखर जमान, फहीम अशरफ, खुशदिल शाह, सलमान अली आघा, अबरार अहमद, हरिस रौफ, मोहम्मद हसनैन, मोहम्मद रिजवान, उस्मान खान, नसीम शाह , शाहीन शाह आफ्रिदी.