IND vs SA 1st T20: भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका पहिला टी20 सामना रद्द होणार? जाणून घ्या कारण

IND vs SA 1st T20 : तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेनंतर आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे.

IND Vs SA 1st T20

IND Vs SA 1st T20

IND vs SA 1st T20 : तीन एकदिवसीय सामन्यांची मालिकेनंतर आजपासून भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यान पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघात शुभमन गिल पुन्हा एकदा भारतीय टी20 संघात कमबॅक करत आहे. मात्र या मालिकेत आज होणार पहिल्या सामना रद्द होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सामन्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता असल्याने हा सामना रद्द होण्याची शक्यता आहे.

पावसामुळे सामना रद्द होणार?

9 डिसेंबर रोजी कटकमधील बाराबती स्टेडियममधील (India vs South Africa 1st T20) तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याची अपेक्षा आहे, ज्यामध्ये 9 किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील. एकदिवसीय सामन्यांप्रमाणे, या स्वरूपात नाणेफेक महत्त्वाची असेल. नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेईल. हा टी20 सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. दोन्ही संघांच्या गोलंदाजीच्या सत्रात दव पडेल, परंतु दुसऱ्या डावात दव अधिक पडणार त्यामुळे टॉस या सामन्यात (India vs South Africa) महत्वाची भूमिका बजावणार. दवमुळे भारतीय संघ तीन वेगवान गोलंदाजांना मैदानात उतरवू शकते, ज्यामध्ये हार्दिक पंड्या तिसरा वेगवान गोलंदाज असण्याची शक्यता आहे.

दोन्ही संघ

भारतीय संघ :

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टिरक्षक), संजू सॅमसन (यष्टिरक्षक), जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्ती, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, वॉशिंग्टन सुंदर.

फोडाफोडी बंद अन् महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय, शिंदे-फडणवीसांची बैठकीत नेमकं ठरलं काय?

दक्षिण आफ्रिका:

एडेन मार्कराम (कर्णधार), डेवाल्ड ब्रुविस, टोनी डी जॉर्गी, रीझा हेंड्रिक्स, डेव्हिड मिलर, जॉर्ज लिंडे, कॉर्बिन बॉश, मार्को जॅन्सेन, क्विंटन डी कॉक (यष्टीरक्षक), डोनोव्हन फेरेरा (यष्टीरक्षक), ट्रिस्टन स्टब्स, ओटनील बार्टमन, केशव महाराज, क्वेना एमफाका, लुंगी एनगिडी, अँरिच नॉर्टजे.

Exit mobile version