फोडाफोडी बंद अन् महापालिका निवडणुकीबद्दल मोठा निर्णय, शिंदे-फडणवीसांची बैठकीत नेमकं ठरलं काय?
Municipal Elections 2025 : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी
Municipal Elections 2025 : राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून राज्यातील 264 नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या निवडणुकीचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहे. या निवडणुकीत कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. तर दुसरीकडे नगरपंचायत आणि नगपरिषदांसाठी झालेल्या या निवडणुकीत मुख्य लढत महायुतीमधील घटक पक्ष भाजप आणि शिवसेनेत पाहायला मिळाली आहे. प्रचारादरम्यान दोन्ही पक्षांनी एकमेकांवर जोरदार हल्लाबोल केला. मालणवमध्ये शिवसेना शिंदे गटाचे आमदार निलेश राणे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यावर पैसे वाटपाचा आरोप करत एका भाजप पदाधिऱ्याच्या घरी जाऊन स्टिंग ऑपरेशन देखील केला होता.
यानंतर मला फक्त 2 डिसेंबरपर्यंत युती टिकावयची असल्याची प्रतिक्रिया रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांच्याकडून आली होती. त्यामुळे शिवसेना आणि भाजप युती संपणार असल्यीच चर्चा राजकीय वर्तुळात जोराने सुरु झाली होती. मात्र आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Ekanth Shinde) यांच्यात सोमवारी 8 डिसेंबर रोजी नागपूरमध्ये बैठक झाली असल्याची माहिती समोर आली आहे.
या बैठकीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) देखील उपस्थित होते असं सांगण्यात येत आहे. तर या बैठकीत दोन्ही पक्षांनी दोन महत्वाचे निर्णय घेतले असल्याची माहिती समोर आली आहे. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, या बैठकीत गेल्या काही दिवसांपासून सुरु असणाऱ्या राजकीय संघर्षावर चर्चा झाली. नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे नेते भाजपवर हल्लाबोल करत होते मात्र आता हा वाद थांबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती आहे.
तर दुसरीकडे पुढील काही दिवसात राज्यात होणाऱ्या महापालिकानगर निवडणुकीसंदर्भात देखील मोठा निर्णय या बैठकीत घेण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई, ठाणे, पुणेसह राज्यातील सर्व महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोराने सुरु आहे. तर महायुतीलमधील तिन्ही पक्षातील नेत्यांना पदाधिकाऱ्यांनाा पक्षात प्रवेश देणार नाही असा निर्णय देखील या बैठकीत झाला आहे.
