“क्यूंकि सास भी कभी बहू” मालिकेच्या कथानकात येणार मोठा ट्विस्ट; ‘हा’ प्रसिध्द अभिनेता करणार मालिकेत एंट्री!

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi : स्टार प्लसवरील आयकॉनिक शो क्यूंकि सास भी कभी बहू थी कायम चर्चेत राहिला आहे. आता या मालिकेत

  • Written By: Published:
Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi

Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi : स्टार प्लसवरील आयकॉनिक शो क्यूंकि सास भी कभी बहू थी कायम चर्चेत राहिला आहे. आता या मालिकेत एक रोमांचक वळण येणार असून ते बघण्याची उत्सुकता प्रेक्षकांना निर्माण झाली आहे कारण या मालिकेत प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांनी खास एपिसोड्ससाठी एंट्री झाली आहे.

गुजराती सिनेमा आणि दूरदर्शनमधील त्यांचा प्रभावी अभिनयासाठी ओळखले जाणारे गोस्वामी यांनी लालो, कृष्ण सदा सहायते या भक्तिमय ब्लॉकबस्टरमध्ये साकारलेल्या कृष्णाच्या भूमिकेमुळे त्यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली आहे. त्यांच्या या मालिकेतील एंट्री बद्दल प्रेक्षक देखील बोलताना दिसत “क्यूंकि सास भी कभी बहू थी” मालिकेच्या कथानकात नवा ट्विस्ट येणार असल्याचं कळतंय.

दर्जेदार अभिनयशैली आणि उत्तम स्क्रीन प्रेझेन्समुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण केलेले श्रुहद गोस्वामी आगामी एपिसोड्समध्ये एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. त्यांच्या या मालिकेतील भूमिकेविषयी अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नसली तरी सूत्रांच्या मते त्यांच्या मालिकेतील विशेष एंट्रीमुळे सध्या सुरू असलेल्या कथानकावर मोठा परिणाम होणार आहे. क्यूंकि सास भी कभी बहू ही मालिका कायम टेलिव्हीजन विश्वात चर्चेत राहिलेली मालिका असून या मालिकेच्या कथानकात नाट्यमय घडामोडी घडताना बघायला मिळणार आहे.

तुलसी मिहिर आणि नोइनाचा एकत्र फोटो पाहिल्यानंतर ती पूर्णपणे अस्थिर झाली असून या अनपेक्षित घटनेमुळे ते खूप भावूक झाल्याचं बघायला मिळतंय. आगामी भागांत मध्ये त्यांचा नात्यात गैरसमज शक्यता निर्माण झाली आहे. त्यांच्या नात्यांची कसोटी लागणार असून येणारे एपिसोड्स प्रेक्षकांसाठी अधिक रोमहर्षक ठरतील यात शंका नाही.

Video : अंबादास दानवेंचा ‘कॅश बॉम्ब’, पैशांचा बंडल असलेला व्हिडिओ पोस्ट अन् राजकारणात खळबळ

मालिकेतील चढ उतार बघताना या वळणावर श्रुहद गोस्वामींच्या एंट्रीमुळे मालिकेत काय अजून उत्कांवर्धक गोष्ट बघायला मिळणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. त्यांच पात्र विराणी कुटुंबातील सुरू असलेल्या गोंधळाशी कसे जोडले जाणार याची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. त्यांच्या मालिकेतील विशेष उपस्थितीने कथानकात वेगळा ट्विस्ट निर्माण होणार असून अजून काय ड्रामा अनुभवयाला मिळणार हे बघण उत्सुकतेच ठरणार आहे. क्यूंकि सास भी कभी बहू थी पाहा 12 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजता फक्त स्टार प्लसवर.

follow us