Download App

Mary Kom : “मी निवृत्तीची घोषणा केलीच नाही”; सोशल मीडियावरील अफवांना मेरी कोमचा फुलस्टॉप!

Mary Kom Retirement : भारताची दिग्गज बॉक्सर मेरी कोम हिने (Mary Kom)आज निवृत्त होण्याची घोषणा केल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या. सोशल मीडियावरही चर्चा सुरू होत्या. मात्र या बातम्या खऱ्या नाहीत. मी निवृत्ती घेतलेली नाही. माझ्या रिटायरमेंटच्या बातम्या चुकीच्या असून मी निवृत्ती घेतलेली नाही, असे मेरी कोमने स्वतःच स्पष्ट केले. जागितक बॉक्सिंग संघटनेच्या नियमानुसार पुरुष आणि महिला बॉक्सर खेळाडूंना चाळीस वर्षे वयापर्यंतच बॉक्सिंगची परवानगी असते. त्यानंतर त्यांना या खेळातून निवृत्ती घ्यावी लागते. या नियमानुसारच बॉक्सिंगमधून निवृत्ती घेत असल्याचे मेरी कोमने सांगितल्याचे वृत्त झळकले होते.

मेरी कोमने सहा वेळेस विश्वविजेतेपद आणि 2012 मध्ये ऑलिम्पिक पदकही जिंकले आहे. खेळातील जबरदस्त कामगिरीमुळे तिने देशाचे नाव जगभरात उंचावले. आपल्यात अजूनही बॉक्सिंग खेळण्याची क्षमता आहे असे मेरी कोमने सांगितले.

आता ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटची एन्ट्री; 2028च्या ऑलिम्पिकसाठी ‘या’ नवीन खेळांना मान्यता

सन 2012 मध्ये झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत मेरी कोमने भारताला कांस्यपदक मिळवून दिले होते. कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या ट्रायल्स दरम्यान तिने शेवटचा सामना खेळला होता. मेरी कोम ही जगातील पहिली अशी महिला बॉक्सर आहे जिने सहा वेळा विश्वविजेते होण्याचा मान मिळवला. 2014 मधील आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी मेरी कोम ही भारतातील पहिली महिला खेळाडू आहे.

एका कार्यक्रमात मेरी कोम म्हणाली, मी माझ्या आयुष्यात सर्वकाही मिळवलं आहे. मला अजूनही बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होण्याची इच्छा आहे. त्यामुळे मी अजूनही बॉक्सिंग खेळू शकते. मी 24 जानेवारी रोजी दिब्रुगढ येथे एका कार्यक्रमाला गेले होते. तिथे निवृत्तीबाबत वक्तव्य केले होते. मात्र मला अजूनही बॉक्सिंगमध्ये खूप यश मिळवण्याची इच्छा आहे. त्यासाठी मी माझ्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करत आहे. जेव्हा मी निवृत्तीची घोषणा करेन तेव्हा मी सर्वांना माहिती देईल, असे मेरी कोमने स्पष्ट केले.

भारतीय ऑलिम्पिक संघटना बनवणार कुस्ती महासंघ चालविण्यासाठी खास पॅनेल; क्रीडा मंत्रायलयाची माहिती

follow us