Indian Cricket Team : भारतीय संघाने (Indian Cricket Team) T20 विश्वचषक जिंकल्यानंतर रोहित शर्मा (Rohit sharma) आणि विराट कोहलीने (Virat Kohli) टी20 ला अलविदा केलं. त्यानंतर आता श्रीलंका मालिका सुरु होण्याआधी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) आणि निवडक अजित आगरकर यांनी भारतीय संघाबद्दल पडणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. मोहम्मद शमीच्या पुनरागमनामुळे चाहत्यांमध्ये आनंदाचं वातावरण असून शमी बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतून परतणार असल्याचं गौतम गंभीर यांनी स्पष्ट केलंय तर शुभमन गिल भारतासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार असल्याचंही गंभीरने स्पष्ट केलंय.
काळजाला सुनेत्रा पवारांचं फुलं; लंकेच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा लाडक्या बहिणींशी संवाद
यासोबतच रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी20 ला अलविदा केलं मात्र, त्यांची फिटनेस चांगली असेल तर ते 2027 मध्ये एकदिवसीय विश्वचषक खेळणार असल्याचंही गंभीरने सांगितलंय. रोहित शर्मानंतर सुर्यकुमार यादव टी20 मध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करणार असल्याचंही गंभीरने सांगितलंय. रोहितनंतर हार्दीक पांड्यावर जबाबदारी येणार असल्याचं बोललं जात होतं मात्र, सुर्यकुमार यादववर ही जबाबदारी देण्यात आलीयं.
श्रीलंका मालिकेसाठी रविंद्र जडेजाची भारतीय संघात निवड झाली नाही. जडेजाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. जडेजाला नक्की कोणत्या कारणामुळे संघात स्थान मिळालं नाही. याबाबतही गौतम गंभीरने स्पष्ट केलंय. रविंद्र जडेजा याला वगळण्यात आलं नसून त्याला विश्रांती देण्यात आलं असल्याचं गंभीरने सांगितलंय.
आता परवानगीची गरज नाही; मैदानात उतरा अन् ठोकून काढा, फडणवीसांचा कार्यकर्त्यांना थेट आदेश
मोहम्मद शमीचे अनेक चाहते आहेत. संघात त्याचं पुनरागमन होणं ही चाहत्यांसाठी आनंदाची बातमी असून मोहम्मद शमी बांग्लादेश कसोटी मालिकेतून परतणार आहे. तसेच शुभमन गिल भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळणार असल्याचंही गंभीरने स्पष्ट केलंय. दरम्यान, श्रीलंका मालिकेपूर्वी गौतम गंभीर आणि अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली असून त्यांनी रोहित शर्मा, विराट कोहली आणि शुभमन गिल यांच्या भवितव्यावर आपले मत व्यक्त केले आहे.