काळजाला सुनेत्रा पवारांचं फुलं; लंकेच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा लाडक्या बहिणींशी संवाद

काळजाला सुनेत्रा पवारांचं फुलं; लंकेच्या बालेकिल्ल्यात अजितदादांचा लाडक्या बहिणींशी संवाद

Dcm Ajit Pawar News : राज्यातील गोरगरीब महिलांसाठी त्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना राबवली आहे. मात्र विरोधकांकडून याला चुनावी जमलं असे म्हटले जात आहे. महिलांचे सक्षमीकरण हाच आमचा उद्देश असून राज्यातील गोरगरीब महिलांसाठी योजना राबवण्यात येत आहे, यावर टीका करणे योग्य नाही, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहे.

अजित पवार म्हणाले, यंदाच्या वर्षाचा अर्थसंकल्प संकल्प सादर केला. मात्र यामध्ये प्रामुख्याने आम्ही माझी लाडकी बहीण योजना ही आणली. महिला मोलमजुरी करतात अनेक काम करतात महिलांना आर्थिक सक्षमीकरण करण्यासाठी आम्ही ही योजना आणल्याचं यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

अडीच कोटीपेक्षा जास्त अडीच कोटींपेक्षा अधिक महिलांना मला या योजनेचा लाभ द्यायचा आहे. आज आम्ही तुमच्या जवळ आलो आहेत आम्ही तुम्हाला जागे करण्यासाठी आलो आहोत. अजून हा फॉर्म भरावा व या योजनेचा लाभ घ्यावा असं देखील यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले. अनेक ठिकाणी तांत्रिक अडचणी आल्या आहेत मात्र काळजी करू नका अडचणी सोडवण्यास सक्षम आहोत. तुम्ही तरी ऑगस्ट महिन्यामध्ये फॉर्म भरला आणि तुम्ही त्याच्यामध्ये लाभार्थी म्हणून बसत असला तर तुम्हाला जुलै व ऑगस्ट महिन्यांचे पैसे दिले जाणार आहे.

तुमची लोकसभेची सूज विधानसभेला उतरवू, रुपाली चाकणकरांची खासदार कोल्हेंवर टीका

विरोधकांनी माझ्यावरती टीका केली या योजनेच्या माध्यमातून मात्र राज्यातील कोणतीही महिला भगिनी असली तिला आर्थिक सक्षम करणं हाच आमचा उद्देश आहे. येणाऱ्या रक्षाबंधनच्या दिवशी माय माऊली यांना त्यांच्या खात्यावरती तीन हजार रुपये जमा करण्याचा आमचा उद्देश आहे.

हा चुनावी जुमला नाही…
राज्य सरकारकडून राबवण्यात येणारे योजनांना विरोधक चुनावी जुमला म्हणतात मात्र काही चुनावी जुमला नाही. समाजातील गरिबांना योजनेचा फायदा व्हावा यासाठी आम्ही या योजना आणत आहोत. असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले.

बहिणी दिल भावांना काय विरोधकांकडून टीका सुरू झाली. मात्र महिला सक्षम झाल्या की देशाचा विकास होतो. महिलांना नेहमीच दुय्यम दर्जा दिला जातो मात्र आता असे होणार नाही. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिलांचे वर्चस्व आहे. यामुळे महिलांसाठी योजना राबवल्या पाहिजे असे यावेळी बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.

माझी लाडकी बहीण योजने योजनेची माहिती देण्यासाठी योजना समजावून सांगण्यासाठी त्याचबरोबर भगिनींशी संवाद साधण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज नगर जिल्हा दौऱ्यावर आले होते ते पारनेर या ठिकाणाहून त्यांचा दौरा सुरू झाला. पारनेर येथे अजित पवार यांनी महिलांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्यासोबत कृषिमंत्री धनंजय मुंडे महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे, राज्य महिला आयोगाच्या रूपाली चाकणकर या उपस्थित होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube