Virat Kohali 10th Marksheet : विराट कोहली हे नाव आपल्या सर्वांसाठी अत्यंत जवळचे आहे. आपल्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने त्याने क्रिकेट प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. भारतातील व भारताबाहेरील अनेक तरुण मुले ही विराटला आपला आदर्श मानतात. त्याच्यासारखी फिटनेस असावी, त्याच्यासारखी बॉड बनवावी हे अनेकांना वाटत असते.
विराटने अनेकवेळा अतीतटीच्यावेळी संयमाने व धीराने खेळ करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला आहे. यामुळे विराट हा चाहत्यांच्या मनावर राज्य करतो. भारतातील तरुण पिढीचा तो आदर्श आहे. याचबरोबर विराट कोहली हा सोशल मीडियावर अत्यंत सक्रीय असतो. त्याने आपले दहावीचे मार्कशीट हे आज कू या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहे.
भारतात वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास पाकिस्तानचा नकार, ICC घेणार मोठा निर्णय
त्याने शेअर केलेल्या या मार्कलिस्टची सर्वत्र चर्चा आहे. अनेकांनी विराट कोहली हा कोणत्या विषयात हुशार होता व कोणत्या विषयामध्ये त्याला कमी गुण होते याची चर्चा करायला सुरुवात केली आहे. विराट कोहली हा 2004 मध्ये पश्चिम विहारमधील सेव्हियर कॉन्व्हेंट स्कूलमध्ये 10वीचे शिक्षण घेत होता. त्याला 10वीच्या परीक्षेत हिंदी विषयात 75 गुण होते. गणितात 51 गुणे होते. इंग्रजीत 83, इंट्रोडक्टरीमध्ये I T मध्ये 58 गुण, विज्ञानात 55 गुण व सामाजिक शास्त्रात 81 गुण मिळाले आहेत.
भारतात वर्ल्ड कपचे सामने खेळण्यास पाकिस्तानचा नकार, ICC घेणार मोठा निर्णय
विराटने या पोस्टला कॅप्शन देखील दिले आहे. “तुमच्या मार्कशीटमध्ये कमीत कमी जोडणाऱ्या गोष्टी तुमच्या चारित्र्याला कशा प्रकारे जोडतात हे मजेदार आहे”, असे कॅप्शन दिले आहे. यानंतर यूजर्सने या पोस्टवर मजेशीर कॉमेंट केल्या आहेत. विराट कोहलीला गणितात कच्चा होता, असे काहींनी म्हटले आहे. विराटने 12वी नंतर आपले शिक्षण सोडले व आपला पूर्ण फोकस क्रिकेटवर दिला.