ICC Champions Trophy 2025 : 2025 मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी (ICC Champions Trophy) पाकिस्तानमध्ये (Pakistan) होणार आहे. यामुळे या स्पर्धेसाठी भारतीय संघ (Team India) पाकिस्तानात जाणार का? हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात पडत आहे. मात्र आता एक मोठी अपडेट समोर आली आहे.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानात जाणार का? या प्रश्नावर आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. बीसीसीआय (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajeev Shukla) यांनी आज एका मुलाखतीमध्ये बीसीसीआयची भुमिका स्पष्ट केली.
माध्यमांशी बोलताना बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्ला म्हणाले, जर चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये होणार असेल तर आम्हाला जे भारत सरकार सांगेल ते आम्ही करू. आम्हाला जर भारतीय सरकारने परवानगी दिली तर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार जर सरकारने परवानगी दिली नाहीतर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही असं बीसीसीआय उपाध्यक्ष राजीव शुक्लाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तर काही दिवसापूर्वी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये होणार नाही अशी चर्चा होत होती आणि जर पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 झाली तर भारतीय संघ पाकिस्तानमध्ये जाणार नाही असं देखील चर्चा होत होती . यामुळे ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळली जाणार असल्याची माहिती समोर आली होती.
‘तेव्हा दादांच्या डोळ्यात अश्रू आले होते’, रोहित पवारांचा पलटवार
मात्र आता आयसीसीचे पिच क्युरेटर आणि सुरक्षा टीम पाकिस्तानात पोहोचल्याने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 पाकिस्तानमध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. यामुळे भारतीय सरकार काय निर्णय घेणार याकडे आता संपूर्ण जगाच्या क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागून आहे.