रोहित वजन कमी कर, तू सर्वात अपयशी कर्णधार…, काँग्रेस नेत्या शमा मोहम्मदची वादग्रस्त पोस्ट व्हायरल

रोहित वजन कमी कर, तू सर्वात अपयशी कर्णधार…, काँग्रेस नेत्या शमा मोहम्मदची वादग्रस्त पोस्ट व्हायरल

Shama Mohammad On Rohit Sharma : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 च्या (ICC Champions Trophy 2025) सेमीफायनलमध्ये भारतीय संघाने धडक दिली आहे. 4 मार्च रोजी भारतीय संघ दुबईत ऑस्ट्रेलियाविरुद्ध (INDvsAUS) चॅम्पियन्स ट्रॉफीचा सेमीफायनल खेळणार आहे मात्र त्यापुर्वी देशातील राजकारणात भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) चर्चेचा विषय बनला आहे. होय, काॅंग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद (Shama Mohammad) यांनी रोहित शर्माच्या फिटनेसबद्दल वादग्रस्त विधान केले आहे. ज्यामुळे काॅंग्रेस (Congress) आणि भाजपमध्ये (BJP) आरोप- प्रत्यारोप सुरु झाले आहे.

शमा मोहम्मद यांनी केलेल्या विधानाबद्दल सध्या सोशल मीडियावर चांगलीच चर्चा सुरु आहे. भारताने काल ( रविवारी ) आपल्या शेवटच्या ग्रुप सामन्यात शानदार कामगिरी करत न्यूझीलंडचा पराभव केला. मात्र या दरम्यान सोशल मीडियावर काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी एक्स वर केलेली एक पोस्ट व्हायरल झाली. त्यांनी या पोस्टमध्ये भारतीय कर्णधार रोहित शर्माला जाड खेळाडू म्हणत रोहितला वजन कमी करण्याचा सल्ला दिला तसेच त्यांनी या पोस्टमध्ये त्याला भारताचा एक अकार्यक्षम कर्णधार  म्हटले आहे.

प्रकरण वाढताच पोस्ट डिलीट

मात्र या प्रकरणात वाद वाढत असल्याने काँग्रेस प्रवक्त्या शमा मोहम्मद यांनी एक्स वर केलेली पोस्ट डिलीट केली. तसेच मी कोणाचाही अपमान करण्यासाठी ट्विट केलेले नाही. त्या ट्विटमध्ये मी म्हटले होते की एक खेळाडू असल्याने त्याचे वजन जास्त आहे. हे बॉडी शेमिंग नाहीये. मी त्याला आधीच्या कर्णधारांशी तुलना केल्यामुळे तो एक अप्रभावी कर्णधार असल्याचे मी म्हटले… कोहली शमीसोबत उभा असताना भाजपच्या लोकांनी त्याच्यावर टीका का केली? तो एक चांगला कर्णधार होता… तो खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचा. तो इतर संघातील खेळाडूंच्या चांगल्या कामगिरीचे कौतुकही करतो. माझ्या मते, विराट एक चांगला कर्णधार आहे… मी एक खेळाडू आहे, म्हणूनच मी फिटनेसबद्दल बोलत आहे. आजकाल पंतप्रधानही फिट इंडियाबद्दल बोलतात… खेळाडूंनी तंदुरुस्त असले पाहिजे. असं त्यांनी स्पष्टीकरण देत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

पवन खेरा यांनी केला शमा मोहम्मदचा बचाव

काँग्रेसच्या मीडिया आणि प्रचार विभागाचे प्रमुख पवन खेरा यांनी शमा मोहम्मद यांच्या विधानावर पोस्ट केली आणि म्हटले की ते पक्षाच्या अधिकृत दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करत नाही. त्यांच्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, ‘भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या राष्ट्रीय प्रवक्त्या डॉ. शमा मोहम्मद यांनी एका क्रिकेट दिग्गजावर केलेल्या टिप्पण्या पक्षाच्या अधिकृत दृष्टिकोनाचे प्रतिनिधित्व करत नाहीत. त्यांना X शी संबंधित सोशल मीडिया पोस्ट काढून टाकण्याचे निर्देश देण्यात आले आहेत आणि भविष्यात अधिक सावधगिरी बाळगण्याचा सल्लाही देण्यात आला आहे.

भाजपची काँग्रेसवर टिका

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते प्रदीप भंडारी म्हणाले, “काँग्रेसला लाज वाटली पाहिजे! आता ते भारतीय क्रिकेट कर्णधाराच्या मागे लागले आहेत! भारतीय राजकारणात अपयशी ठरल्यानंतर राहुल गांधी आता क्रिकेट खेळतील अशी त्यांची अपेक्षा आहे का?” काँग्रेस नेत्याचे हे वक्तव्य त्यांच्या पक्षाच्या मानसिकतेचे प्रतिबिंब आहे आणि भारतीय क्रिकेट संघाला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येक देशभक्ताचा अपमान आहे.

‘पुन्हा एकदा साडे माडे तीन’चे चित्रीकरण संपन्न, ‘या’ दिवशी होणार रिलीज

शमा मोहम्मद यांची पोस्ट

‘रोहित हा जाडा आहे. त्याला त्याचं वजन कमी करण्याची गरज आहे आणि भारताच्या कर्णधारांमध्ये तो सर्वात अपयशी कर्णधार आहे.’

follow us
  • fb
  • instagram
  • youtube