‘तेव्हा दादांच्या डोळ्यात अश्रू आले होते’, रोहित पवारांचा पलटवार
Rohit Pawar On Ajit Pawar : बारामती लोकसभा निवडणुकीसाठी (Baramati Lok Sabha) प्रचार संपला असला तर रोहित पवार (Rohit Pawar) यांच्याकडून अजित पवार (Ajit Pawar) आणि महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांवर हल्ले सुरु आहे. आज त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये अनेक प्रश्नांचे उत्तर देत पुन्हा एकदा अजित पवार यांच्यासह महायुतीच्या नेत्यांवर निशाण साधला.
बारामती मतदारसंघात अजित पवारांचा प्रचार गुंडांकडून होत आहे. याचे पुरावे देखील समोर आले आहे. यामुळे बारामती मतदारसंघातील लोकांनी याचा विचार करून मतदान करावे असं आवाहन त्यांनी बारामतीकरांना केला आहे. तर या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे (Supriya Sule) पुन्हा एकदा विजय होणार असा विश्वास देखील रोहित पवारांनी व्यक्त केला.
तर देवेंद्र फडणवीस यांनी माढा लोकसभा मतदारसंघात केलेल्या टीकेला उत्तर देत रोहित पवार म्हणाले, देवेंद्र फडणवीस काय म्हणतात याला लोकचं किंमत देत नाही, लक्ष देत नाही, आज लोकचं म्हणत आहे ही व्यक्ती खोटं बोलत आहे, त्यांनी अजित पवारांवर अनेक भ्रष्टाचारांचे आरोप केले होते मात्र आज अजित पवार त्यांच्याकडे आहे असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली.
महायुतीच्या नेत्यांकडून होत असलेल्या आरोपांबद्दल देखील या पत्रकार परिषदेमध्ये रोहीत पवारांनी उत्तर दिले आहे. रोहित पवार म्हणाले, मलिंदा गॅंगला माझ्या वैचारिक लेव्हल ठरवण्याचा अधिकार नाही, माझ्या मतदारसंघातील लोकांना तो अधिकार आहे. मलिंदा गॅंगनी यावर बोलू नये म्हणत रोहित पवार यांनी महायुतीच्या नेत्यांना टोला लावला.
मतांसाठी तुम्ही भावनिक झाले का ? या प्रश्नावर उत्तर देत रोहित पवार म्हणाले, कालचा भाषण मी मनापासून करत होतो, त्याचा काय प्रभाव होईल मी याचा विचार केला नव्हता, शरद पवार यांची ही निवडणूक शेवटची असेल असं अजित पवार म्हणाले होते, त्यांच्या नेत्यांकडून पवार साहेबांचा वय काढण्यात आले, या गोष्टी ऐकल्यानंतर मी भावनिक झालो, माझा मतांचा हेतू नव्हता.
जेव्हा ईडी आणि सीबीआयची कारवाई झाली होती तेव्हा दादांच्या डोळ्यात आपण सर्वांनी अश्रू पाहिले आहे. मी आजपर्यंत नाटक केलं नाही. मी माणूस आहे, ज्याचा जिवंत मन असतो तो भावुक होतो, लोकांचा प्रतिसाद पाहून मी भावनिक झालो, दादा नाटक करत आहे ते त्यांचा प्रश्न आहे असं रोहित पवार म्हणाले.
पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मुंबईत मराठी लोकांना नोकऱ्या नाकारण्यात येत आहे या विषयावर देखील भाष्य केले, रोहित पवार म्हणाले गुजराती माणसाचा अतिआत्मविश्वास सध्या वाढला आहे, त्यांना माहिती आहे महाराष्ट्रातील राजकारणी आपल्या पाठिशी आहेत. यामुळेच आज मुंबईत मराठी लोकांना नोकऱ्या नाकारण्यात येत आहे. भेदभाव करणाऱ्या लोकांवर कायदेशीर कारवाई केली पाहिजे असं रोहित पवार म्हणाले.
याच बरोबर त्यांनी शरद पवार यांच्या तबियतीबद्दल देखील माहिती दिली. रोहित पवार म्हणाले, गेल्या 20 दिवसात शरद पवार यांनी 52 सभा घेतल्या, गेल्या 20 दिवसात दररोज ते जास्तीत जास्त 4 तास झोपले आहे. मात्र आज संध्याकाळी पर्यंत त्यांची तबियत ठीक होईल अशी अपेक्षा आहे. असं रोहित पवार म्हणाले.
शेवटच्या क्षणी राणेंना उमेदवारी मात्र विधानसभेत आम्ही … रामदास कदमांचा थेट महायुतीला इशारा
राज ठाकरे यांच्यावर टीका करत रोहित पवार म्हणाले, राज ठाकरे यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांची पहिली सभा कोकणात झाली पुढे मुबंईत होऊ शकते मात्र 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात केलेल्या भाषणात त्यांनी भाजपवर टीका केली होती मात्र आता त्यांना त्यांच ठिकाणी जाऊन महायुतीसाठी प्रचार करावा लागतात आहे. मात्र जनतेला दुट्टपी भूमिका पटत नाही असं म्हणत त्यांनी राज ठाकरेंना टोला लावला.