“होय, मी बारामतीची लेक, तुमच्यापेक्षा येथे जास्त राहते”; सुप्रिया सुळेंनी अजितदादांना ठणकावलं!

“होय, मी बारामतीची लेक, तुमच्यापेक्षा येथे जास्त राहते”; सुप्रिया सुळेंनी अजितदादांना ठणकावलं!

Supriya Sule Speech in Baramati : मी आहे बारामतीची लेक. मी येथे राहते. या देशाचा आणि राज्याचाच निर्णय आहे जेवढा हक्क मुलाचा आहे तेवढाच हक्क एका मुलीचाही आहे. बऱ्याच लोकांना त्रास होतो की सुळे येथे का राहतात. अरे इथे माझं घर आहे. नंतर काय म्हणाले की सात तारखेनंतर सगळी जातील छत्र्यांसारखी. तुम्ही तुमचं बघा. तुम्ही किती दिवसांतून अधूनमधून बारामतीला येता त्याचा हिशोब काढला ना तर तुमच्यापेक्षा आम्ही बारामतीत जास्त असतो. त्यामुळे आमचे दिवस मोजू नका तुम्ही तुमचे दिवस मोजा, अशा शब्दांत बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

सुळे पुढे म्हणाल्या, आपण एका पक्षात एक कुटुंब म्हणून काम करत होतो. आज मला तुम्हाला विचारायचंय की मी पक्षाकडं असं काय मागितलं जे तुम्हाला हवं होतं. एक लोकसभेचं तिकीट मागितलं. ते कुणालाच नको होतं. साहेब प्रत्येकाला विचारायचे लोकसभा लढतोस का? तो म्हणायचा साहेब माझं काही चुकलं का? मला का लोकसभेला पाठवताय? कधीही त्यांनी लोकसभेचं तिकीट किंवा मी इच्छुक आहे असं सांगितलं असतं ना नक्कीच दिलं असतं.

“अरे मामा जरा जपून, तुला सरळ करायला वेळ लागणार नाही” दत्तामामा भरणेंना शरद पवारांचा दम

रोज आमच्यावर टीका केली जाते. मी प्रत्येकाचं उत्तर देऊ शकते. आरे ला कारे म्हणायला ताकद लागत नाही. आरे म्हटल्यानंतर खरं माहिती असलं तरी गप्प बसायला जास्त ताकद लागते आणि ती माझ्यात आहे. माझ्याबद्दल बरंच काही बोललं गेलं, पण मी त्यांच्यावर बोलणार नाही. कारण मला माहिती आहे मी निष्ठेनं काम केलंय. मी कुणाच्या पाच रुपयांचीही मिंधी नाही. त्यामुळे माझ्या इलेक्शनमध्ये कुठेही ठेकेदार मटनाची जेवणं घालत नाहीत, असा टोला सुळेंनी लगावला.

साध्या पीआयच्या बदलीसाठी कधी विनंती केली नाही

माझ्या विचारांचा खासदार आणा असं सांगितलं जातं. मग अठरा वर्ष तुमच्याच विचाराचा खासदार होता.  मोठा भाऊ म्हणून नेहमी मानसन्मान केला. भाऊ म्हणून नेहमी एक पाऊल मागे उभी राहिले. कधीच ढवळाढवळ केली नाही. त्या राहुल कुलला विचारा. नाहीतर भरणे मामांना विचारा. संजय जगताप किंवा संग्राम थोपटेंना विचारा. एक पीआयच्या बदलीसाठी तरी कधी विनंती केली का? तुम्ही म्हणाल ती पूर्व दिशा. आज त्याच वागण्यासाठी तुम्ही माझ्यावर टीका करता अशी शब्दांत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना जाब विचारला.

योग्यतेच्या माणसांनी प्रश्न विचारला तर उत्तर देईन, म्हणणाऱ्या अजित पवारांना रोहित पवारांचा सडेतोड उत्तर !

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज