‘असली नौटंकी खपवून घेणार नाही’ अजित पवारांचा रोहित पवारांवर घणाघात

‘असली नौटंकी खपवून घेणार नाही’ अजित पवारांचा रोहित पवारांवर घणाघात

Ajit Pawar On Rohit Pawar: आज बारामती मतदारसंघात (Baramati Loksabha) प्रचाराचा शेवटचा दिवस होता. यामुळे बारामतीमध्ये आज अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून जाहीर सभा घेण्यात आले होते. शरद पवार यांच्या सभेत बोलताना कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांना अश्रू अनावर झाले.

तर दुसरीकडे अजित पवार यांनी रोहित पवार यांची रडण्याची नक्कल करत बारामतीकरांना ही नौटंकी चालणार नाही, असं म्हटलं आहे. सभेत बोलताना अजित पवार म्हणाले, मी तु्म्हाला सांगितलं होतं की, शेवटच्या सभेत कोणीतरी भावनिक करण्याचा प्रयत्न करणार, आज आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो, मला मतदान द्या, आता ही असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाहीत. तुम्ही तुमचं काम दखवा, हा झाला रडीचा डाव. हे असलं नाही चालतं. मी तुम्हाला सांगत होतो, काही काही जण ते करणार आहेत. अरे यांना जिल्हा परिषदेची तिकीट आम्ही दिली.अशी टीका अजित पवारांनी रोहित पवारांवर केली.

रोहित पवारांना अश्रू अनावर

शरद पवार यांच्या सभेत बोलताना रोहित पवार म्हणाले, ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला त्यावेळी आम्ही काही पदाधिकारी पवार साहेबांसोबत होतो. तेव्हा ते टीव्ही पाहत होते मात्र त्यांनी चेहऱ्यावर दुःख दिसू दिले नाही. यावेळी त्यांनी सांगितले तुम्ही काळजी करू नका. आपल्याला स्वाभीमानी महाराष्ट्र घडवायचा आहे.

‘बारामतीला कोणीही धक्का लावू शकत नाही’, शरद पवारांनी भरसभेत ललकारले

तो घडवत असताना किंवा तो घडवण्यासाठी आपल्याला नवी पिढी घडवायची आहे आणि ती नवी पिढी जबाबदारी घेत नाही किंवा त्या पिढीची जबाबदारी पेलण्याची क्षमता होत नाही, तो पर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे पवारसाहेबांचे शब्द होते. हे बोलताना रोहित पवारांना अश्रू अनावर झाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube