INDW vs BANW: भारत-बांगलादेश वनडे मालिका बरोबरीत, निर्णायक सामना अनिर्णित

INDW vs BANW: महिला क्रिकेटमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळली गेलेली तीन सामन्यांची वनडे मालिका अनिर्णित राहिली. मालिकेतील शेवटचा सामना खूपच रोमांचक झाला. पण तो अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने भारताला 225 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ केवळ 225 धावाच करू शकला. भारताकडून हरलीन देओलने 77 धावांची […]

WhatsApp Image 2023 07 22 At 6.32.51 PM

WhatsApp Image 2023 07 22 At 6.32.51 PM

INDW vs BANW: महिला क्रिकेटमध्ये भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळली गेलेली तीन सामन्यांची वनडे मालिका अनिर्णित राहिली. मालिकेतील शेवटचा सामना खूपच रोमांचक झाला. पण तो अनिर्णित राहिला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने भारताला 225 धावांचे लक्ष्य दिले होते. याला प्रत्युत्तर देताना हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ केवळ 225 धावाच करू शकला. भारताकडून हरलीन देओलने 77 धावांची शानदार खेळी केली. तर स्नेह राणाने 2 बळी घेतले. या मालिकेतील पहिला सामना बांगलादेशने तर दुसरा सामना भारताने जिंकला होता. (Indw vs Banw India Women And Bangladesh Will Share Odi Trophy 3rd Match Tied Dhaka)

बांगलादेशने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाकडून स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा सलामीला आल्या. मंधानाने 85 चेंडूंत 59 धावा केल्या. या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. शेफाली 3 चेंडूत 4 धावा करून बाद झाली. यस्तिका भाटिया 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. हरलीन देओलने 77 धावांची शानदार खेळी केली. तिने 108 चेंडूंचा सामना करत 9 चौकार मारले. कर्णधार हरमनप्रीत कौर काही विशेष करू शकली नाही. ती 14 धावा करून बाद झाली.

दीप्ती शर्मा 1 धाव घेत बाद झाली. अमनजोत कौरने 10 धावा केल्या. स्नेह राणा आणि देविका वैद्य यांना खातेही उघडता आले नाही. जेमिमा रॉड्रिग्ज शेवटपर्यंत ठाम राहिली. तिने 45 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. शेवटच्या षटकात 6 धावा काढून मेघना सिंग पॅव्हेलियनमध्ये परतली. सामना बरोबरीत संपला.

इंटिमेट सीन अन् भगवद्गीता वाचन, Oppenheimer वादात; निर्मात्यांसह सेन्सॉरवर प्रेक्षक भडकले

नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने 50 षटकांत 4 गडी गमावून 225 धावा केल्या. यादरम्यान फरगाना हकने शतक झळकावले. तीने 160 चेंडूत 107 धावा केल्या. फरगानाच्या या खेळीत 7 चौकारांचा समावेश होता. शमीमा सुलतानाने 78 चेंडूत 52 धावा केल्या. सुलतानाच्या खेळीत 5 चौकारांचा समावेश होता. कर्णधार निगार सुलतानाने 36 चेंडूत 24 धावा केल्या. रितू मोनी 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतली. शोभनाने नाबाद 23 धावा केल्या. त्याच्या खेळीत 2 चौकारांचा समावेश होता.

Exit mobile version