Download App

इंग्लंडचे 136 धावांवर लोटांगण, टीम इंडियाकडे मोठी आघाडी; शर्माची घातक गोलंदाजी

India Women vs England Women : महिला क्रिकेट टीम भारत आणि इंग्लंड (INDW vs ENGW) यांच्यात मुंबईत कसोटी सामना खेळला जात आहे. आज सामन्याच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 136 धावांवर गडगडला. नवी मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर टीम इंडियाच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. दीप्ती शर्माने (Deepti Sharma) 5 विकेट घेतल्या. स्नेह राणाला 2 विकेट मिळाल्या. इंग्लंडकडून नॅट सायव्हर ब्रंट हिने अर्धशतक झळकावले.

भारताच्या पहिल्या डावानंतर ब्युमॉंट आणि डंकली ह्या इंग्लंडकडून सलामीला आल्या होत्या. डंकली जास्त वेळ क्रीजवर टिकू शकला नाही. 10 चेंडूत 2 चौकारांच्या मदतीने 11 धावा करून ती बाद झाली. रेणुका सिंगने तिला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. 35 चेंडूत 10 धावा करून ब्युमॉंट बाद झाली. कर्णधार हीथर नाईटलाही विशेष काही करता आले नाही. 23 चेंडूत 11 धावा करून ती बाद झाली. पूजा वस्त्राकरने नाइटला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला.

नॅट सायव्हरने चांगली फलंदाजी करत अर्धशतक झळकावले. तिने 70 चेंडूंचा सामना करत 59 धावा केल्या. सायव्हरच्या या खेळीत 10 चौकारांचा समावेश होता. तिला स्नेह राणाने बाद केले. डॅनियल व्याट 19 धावा करून बाद झाली. तिला दीप्ती शर्माने बाद केले. दीप्तीने यष्टिरक्षक फलंदाज अॅमी जोन्सलाही पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. जोन्स 12 धावा करून बाद झाली. अशाप्रकारे संपूर्ण संघ 136 धावांवर तंबूत परतला. इंग्लंडचा संघाला केवळ 35.3 षटकेच खेळता आली.

Madras High Court : धोनीवर आरोप करणं भोवलं; IPS अधिकाऱ्याला 15 दिवसांचा तुरूंगवास

टीम इंडियाकडून गोलंदाजी करताना दीप्ती शर्माने 5 विकेट घेतल्या. तिने 5.3 षटकात फक्त 7 धावा देत 4 मेडन षटके टाकली. स्नेह राणाने 6 षटकात 25 धावा देत 2 विकेट घेतल्या. रेणुका सिंग आणि पूजा वस्त्राकर यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. राजेश्वरी गायकवाड यांना एकही विकेट मिळाली नाही. तिने 6 षटकात 25 धावा दिल्या. आता टीम इंडिया दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.

Bhumi Pednekar : हाय परम सुंदरी, भूमीच्या मादक अदा

पहिल्या डावात 428 धावा केल्यानंतर भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत इंग्लंडला पहिल्या डावात 136 धावांत गुंडाळले. दीप्ती शर्माने घातक गोलंदाजी करत पाच विकेट घेतल्या. पहिल्या डावाच्या आधारे भारताला 292 धावांची आघाडी मिळाली आहे.

Tags

follow us