Ishan Kishan : टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज ईशान किशनचे (Ishan Kishan) लाड बीसीसीआय (BCCI) खपवून घेणार नाही. त्याचावर बीसीसीआयसोबतचा करार गमावण्याची टांगती तलवार आहे. रणजी ट्रॉफीमध्ये (Ranji Trophy) झारखंडकडून एकही सामना न खेळल्याने बीसीसीआयने इशान किशनवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. देशांतर्गत क्रिकेटपेक्षा आयपीएलला प्राधान्य दिल्याचा आरोप ईशानवर आहे. इतकंच नाही तर ईशान किशन टीम इंडियात कधी परतणार हा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे.
ईशान किशनला सध्या बीसीसीआयने राष्ट्रीय कराराच्या सी श्रेणीत ठेवले आहे. बीसीसीआय सी श्रेणीतील खेळाडूंना वार्षिक एक कोटी रुपये फी देते. ईशान किशनबद्दल बोलताना बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले की, राष्ट्रीय कराराबद्दल अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही.
Paytm UPI,QR आणि Soundbox पूर्वीप्रमाणे वापरता येणार? कंपनीने दिली सविस्तर माहिती
ईशानच्या अडचणी वाढल्या
मानसिक आरोग्याचे कारण देत दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून माघार घेतल्यानंतर ईशान किशनच्या अडचणी वाढल्या आहेत. यानंतर ईशान किशनला अफगाणिस्तानविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी संघात स्थान मिळाले नाही. ईशान इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत पुनरागमन करू शकतो, अशी शक्यता वर्तवली जात होती.
किंग खानने ‘वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट 2024’च्या परिषदेत हॉलीवूडच्या कामाबद्दल थेटच सांगितलं, म्हणाला…
पण तरीही निवड झाली नाही. ईशानला पहिल्या दोन टेस्टमधून बाहेर ठेवण्यात आले. यानंतर किशनला शेवटच्या तीन टेस्टमध्येही टीम इंडियामध्ये स्थान मिळालेलं नाही.
टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी स्पष्ट केले होते की, ईशान किशनला पुनरागमन करण्यासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळावे लागेल. पण ईशानने हे मान्य केले नाही आणि झारखंडच्या सर्व रणजी सामन्यांमधून तो बाहेर राहिला. ही अट पूर्ण न केल्याने आता ईशानच्या पुनरागमनाची शक्यता कमी झाली आहे.
Anil Kapoor: अनिल कपूरचा आयकॉनिक रोमँटिक भूमिकांचा अनोखा प्रवास