Download App

यानिक सिनरने जिंकला विम्बल्डन 2025चा किताब, मिळाले कोटींचे बक्षीस

 Wimbledon 2025 : विम्बल्डन ही ( Wimbledon 2025) जगातील सर्वात जुनी आणि प्रतिष्ठेची टेनिस (Tennis) स्पर्धा आहे. वर्षातील तिसऱ्या ग्रँड स्लॅम स्पर्धेतील पुरुष एकेरीचा अंतिम सामना प्रेक्षकांच्या उत्साहाच्या शिखरावर (Jannick Sinner) गेला. इटलीच्या यानिक सिनरने गतविजेता कार्लोस अल्काराझचा पराभव करत 2025 चे विम्बल्डन विजेतेपद आपल्या नावे केलं. हा सामना चार सेट्समध्ये खेळला (Sport News) गेला. सिनरने 4-6, 6-4, 6-4, 6-4 असा जबरदस्त विजय मिळवला.

*सिनरचा दमदार विजय*

सामन्याच्या सुरुवातीला अल्काराझने पहिला सेट 6-4 असा जिंकून वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न केला. मात्र, सिन्नरने त्यानंतर आपल्या खेळात कमालीचा बदल करत पुढील तीनही सेट्स जिंकले. त्याच्या अचूक सर्व्हिसेस, ताकदीच्या ग्राउंड स्ट्रोक्स आणि शांत संयमाने तो आघाडीवर राहिला. हा यानिक सिन्नरच्या कारकिर्दीतील चौथा ग्रँड स्लॅम ठरला असून, विम्बल्डनवरील त्याचं हे पहिलं विजेतेपद आहे.

शिवसेना अन् धनुष्यबाण नेमका कोणाचा? सर्वोच्च न्यायालयात आज महत्त्वाची सुनावणी

*फायनलपर्यंतचा प्रवास*

सिनरने उपांत्य फेरीत ग्रँड स्लॅम विजेता नोवाक जोकोविचचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. हा विजय त्याच्यासाठी केवळ मोठा पराक्रम नव्हे, तर आत्मविश्वास वाढवणारा क्षण होता. अंतिम फेरीतही त्याने तोच जोश टिकवत राखला. अल्काराझनेदेखील संघर्ष केला, पण सिन्नरची रणनीती, तांत्रिकता आणि मानसिक स्थैर्य त्याला पराभव देण्यासाठी पुरेसं ठरलं.

ब्रेकिंग! उड्डाणानंतरच लागली विमानाला आग, एअरपोर्टवरच कोसळलं; 15 जणांचा मृत्यू

*कोटींची बक्षिसं*

विजेतेपदाबरोबरच यानिक सिन्नरला मिळालेले 3,00,000 पौंड (भारतीय चलनात सुमारे 34 कोटी रुपये) हेही चर्चेचा विषय ठरले. उपविजेता अल्काराझलाही 1,520,000 पौंड (सुमारे 17 कोटी रुपये) मिळाले. सिन्नरच्या या ऐतिहासिक विजयामुळे टेनिसच्या जागतिक व्यासपीठावर त्याचे स्थान अधिक भक्कम झाले आहे. तो केवळ एक उदयोन्मुख खेळाडू राहिलेला नाही, तर आता तो ग्रँड स्लॅम चॅम्पियन म्हणून टेनिस इतिहासात अजरामर झाला आहे.

यानिक सिनर कोण आहे?

– यानिक सिनर 24 वर्षांचा इटालियन खेळाडू
– वयाच्या आठव्या वर्षी त्याने जायंट स्लॅलममध्ये राष्ट्रीय अजिंक्यपद
– वयाच्या 12 व्या वर्षी तो राष्ट्रीय उपविजेता
– वयाच्या 13 व्या वर्षी सिनर टेनिसकडे वळला
– सिनरने वयाच्या 16 व्या वर्षी व्यावसायिक स्पर्धांमध्ये भाग घेण्यास सुरुवात
– वयाच्या 17 व्या वर्षी एटीपी चॅलेंजर टूर जिंकली
– 2019 मध्ये यानिक सिनरने जागतिक क्रमवारीत टॉप 100 मध्ये स्थान मिळवले
– नेक्स्ट जनरेशन एटीपी फायनल्स, एटीपी न्यूकमर ऑफ द इयर पुरस्कार जिंकला

 

follow us