‘मुलीची हत्या झालीय, फाशी द्या!’ टेनिसपटू राधिकाच्या हत्येप्रकरणी काका विजय यांचे धक्कादायक खुलासे

‘मुलीची हत्या झालीय, फाशी द्या!’ टेनिसपटू राधिकाच्या हत्येप्रकरणी काका विजय यांचे धक्कादायक खुलासे

Radhika Yadav Killing Case Uncle Vijay Allegations : गुरुग्राममधील राधिका यादव (Tennis) हत्याकांडात अटक केलेल्या वडिलांची पोलीस कोठडीत चौकशी सुरू आहे. आज रिमांडची मुदत (Radhika Yadav) संपत होती, त्यामुळे न्यायालयात हजर करण्यात आले, तेथून त्यांना 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले. गुरुवारी सकाळी झालेल्या या भयानक घटनेनंतर, राधिकाच्या कुटुंबासह संपूर्ण देश (Radhika Yadav Case) हादरला आहे. या घटनेनंतर लगेचच घटनास्थळी पोहोचलेल्या दीपकचा मोठा भाऊ (राधिकाचा काका) विजय यादवने ‘आज तक’शी बोलताना धक्कादायक खुलासे केले आहेत.

मुलीची हत्या झाली

विजय यादव म्हणाले की, गोळीबाराचा आवाज ऐकताच ते वरच्या मजल्यावर धावले. दीपक तिथे बसून रडत होते. ते म्हणाले की, दादा मुलीची हत्या झाली आहे. विजयने ताबडतोब पोलिसांना माहिती दिली. त्यांना इशाराही दिला की, (Crime News) दीपक कोणत्याही क्षणी स्वतःला इजा करू शकतो. दीपकने विनंती केली आहे की, त्याच्याविरुद्ध अशा प्रकारे आरोपपत्र तयार केले जावे की त्याला मृत्युदंड मिळेल. दीपक रडत होता. तो खूप दुःखी होता. मला भीती वाटत होती की, तो स्वतःला गोळी मारेल.

… तर टायरात घालून मारा, दहा पिढ्या आठवल्या पाहिजे; बारामतीकरांना उपमुख्यमंत्री अजितदादांचा दम

रिव्हॉल्व्हर ड्रॉईंग रूममध्ये

कुलदीप यादव यांच्या म्हणण्यानुसार, सकाळी साडेदहा वाजता त्यांना मोठा स्फोट ऐकू आला. जेव्हा ते वरच्या मजल्यावर पोहोचले तेव्हा राधिका स्वयंपाकघरात रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. रिव्हॉल्व्हर ड्रॉईंग रूममध्ये ठेवण्यात आले होते. कुलदीप आणि त्याचा मुलगा पीयूष यांनी तिला तातडीने रुग्णालयात नेले, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये हे देखील स्पष्ट झाले आहे की, चार गोळ्या अगदी जवळून झाडण्यात आल्या होत्या.

MSCB घोटाळ्यात ED चं आरोपपत्र; रोहित पवारांची मात्र ठाम भूमिका, ‘फितुरीला थारा नाही…’

वडिलांनी आक्षेप घेतला अन्…

आता पोलीस आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमध्ये किती गोळ्या होत्या? हे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. टेनिस अकादमी चालवणे हे वडील आणि मुलीतील वादाचे कारण बनले. गुरुग्राम पोलिसांनी सांगितले की, राधिका यादव ही टेनिसपटू होती. ती खेळाडूंना प्रशिक्षणही देत असे. पण तिची स्वतःची अकादमी नव्हती. ती वेगवेगळ्या ठिकाणी टेनिस कोर्ट बुक करून खेळाडूंना प्रशिक्षण देत असे. तिच्या वडिलांनी यावर आक्षेप घेतला. यामुळे दोघांमध्ये वाद निर्माण झाला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube