Radhika Yadhav : टेनिसपटू लेकीची हत्या, दीपक यादवांनी टेनिस प्रशिक्षणावर खर्च केले 2.5 कोटी

Radhika Yadhav Murder Case: गुरूग्राम येथील २५ वर्षीय टेनिसपटू राधिका यादवची (Radhika Yadav) गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. तिच्या वडिलांनीच ही हत्या केल्याचं समोर आलंय. या प्रकरणानंतर एकच खळबळ उडाली असून गुरुग्राम पोलिसांनी (Gurugram Police राधिकाच्या वडिलांना ताब्यात घेतलं. दरम्यान, टेनिसपटू राधिकाला आपल्याच गावातील लोकप्रिय कंटेंट क्रिएटर एल्विश यादवसाऱखं (Elvis Yadav) सोशल मीडिया इन्फ्लुएंसर बनण्याची इच्छा झाली होती. तर एसीपी यशवंत यांच्या मते, राधिकाचे वडील दीपक यादव (Deepak Yadav) यांनी तिच्या टेनिस प्रशिक्षणावर २.५ कोटी रुपये खर्च केले.
Video : राऊतंचा आरोप ठरला खरा; हातात शिगारेट अन् बॅगेत पैसे, शिंदेच्या मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल
गुरुग्राममधील सेक्टर ५७ मधील एका घरात दुपारी १२ वाजता टेनिसपटू राधिका यादवची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. धक्कादायक बाब म्हणजे, तिच्या वडिलांनीच ही हत्या घडवून आणली. मिळालेल्या माहितीनुसार, राधिका यादवच्या वडिलांनी तिच्यावर एकामागून एक तीन गोळ्या झाडल्या, त्यानंतर राधिकाला गंभीर अवस्थेत एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
सूत्रांनी सांगितले की राधिकाने तिच्या वडिलांना आश्वासन दिले होते की, ती त्यांचे प्रयत्न व्यर्थ जाऊ देणार नाही. मला खेळता आले, याचा मला आनंद आहे. मी भरूपूर खेळले आहे. आता पैसे कमवीन, असं ती वारंवार आपल्याला वडिलांना सांगायची. तिचे स्वप्न एल्विश यादवसारखे सोशल मीडियावर मोठे होण्याचे होते. त्यासाठी ती इंस्टाग्रामवर रील बनवत असे.
Video : राऊतंचा आरोप ठरला खरा; हातात शिगारेट अन् बॅगेत पैसे, शिंदेच्या मंत्र्यांचा व्हिडिओ व्हायरल
रील शूटिंग करताना राधिका अनेकदा तिच्या आईला सोबत घेऊन जायची. तिने तिच्या कुटुंबाला वचन दिलं होतं की, आपण कधीही असे काहीही करणार नाही, ज्यामुळे कुटुंबाला मान खाली घालावी लागेल.
राधिकाचे सोशल मीडिया अकाउंट कोणी डिलीट केले याचा पोलीस तपास करत आहे. आम्ही हत्येत कुटुंबातील इतर कोणी सहभागी होता का याचाही तपास करत आहोत, असे एसीपी यशवंत म्हणाले.
एसीपी यशवंत म्हणाले, राधिका कोणताही निर्णय घेण्यापूर्वी नेहमीच तिच्या कुटुंबाचा सल्ला घेत असे. तिच्या आर्थिक मिळकतीवरच कुटुंब चालत होते. त्यामुळं इतरांकडून दीपक यादवला टोमणे दिले जायचे. तू तुझ्या मुलीच्या कमाईवर जगतो, मुलीच्या पैसांवर मजा करतोय, कधीपर्यंत मुलीच्या कमाईवर जगणार, असं टोमणे त्याला सतत ऐकायला मिळायचे. या टोमण्यांमुळे तो मानसिक तणावात होता. याच मानसिक त्रासातून त्याने हे भयंकर पाऊल उचललं,असं एसीपी यशवंत म्हणाले.