French Open 2025 Photo : इतिहास घडवला! अल्काराझ-सिनर मैदानात कसे भिडले, पाहा

- फ्रेंच खुल्या टेनिस स्पर्धेतला पुरुषांच्या एकेरीचा हा अंतिम सामना भन्नाट म्हणावा असाच झाला.
- पाचही सेट चुरशीचे झाले. यात स्पेनच्या कार्लोस अल्काराझने बाजी मारली.
- ही लढत चालली ३२९ मिनिटं. दोन्ही खेळाडूंचं सगळं काही पणाला लागलं होतं.
- Image (64)
- शेवटच्या सेटमध्ये अल्काराझ आघाडीवर होता. पण सिनरने पुन्हा उचल खाल्ली.
- यावेळी गतविजेता अल्काराझचं सामन्यात पुनरागमन झालं. त्यानं तीन मॅच पॉइंट वाचवले. स्वतःलाही वाचवत पुन्हा स्पर्धेत आणलं.
- पहिले दोन सेट जिंकणारा सिनर विजेतेपदाकडे दमदारपणे वाटचाल करीत होता. तिसरा सेट अल्काराझने जिंकला आणि चौथ्या सेटला महत्त्व आलं.
- पहिले जवळपास तीन तास सामन्यावर बऱ्यापैकी वर्चस्व असलेल्या इटलीच्या यानिक सिनर ह्याच्यावर त्याने बाजी पलटवली.