Download App

Boxing Day Test मध्ये जसप्रीत बुमराह – रवींद्र जडेजा रचणार इतिहास, मोडणार मोठा विक्रम

Boxing Day Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरुअसणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील (Border-Gavaskar Trophy) चौथा आणि बॉक्सिंग डे

  • Written By: Last Updated:

Boxing Day Test : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरुअसणाऱ्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमधील (Border-Gavaskar Trophy) चौथा आणि बॉक्सिंग डे कसोटी (Boxing Day Test) सामना मेलबर्न (Melbourne) क्रिकेट मैदानावर 26 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी भारतासाठी हा महत्वाचा सामना असणार आहे.

बॉर्डर- गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. या मालिकेत पहिला सामना भारताने जिंकला आहे तर ऑस्ट्रेलियाने दुसरा सामना जिंकला होता आणि तिसरा सामना ड्रॉ झाला आहे. त्यामुळे भारतासाठी हा सामना खूप महत्वाचा आहे.

तर दुसरीकडे भारतीय स्टार खेळाडू जसप्रीत बुमराह (Jaspreet Bumrah) आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यांना देखील या सामन्यात इतिहास रचण्याची संधी आहे. या सामन्यात या दोघांनाही कसोटी क्रिकेटमध्ये मोठा विक्रम करण्याची संधी आहे. या सामन्यात बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये आपले 200 बळी पूर्ण करू शकतो.

सध्या या मालिकेत जसप्रीत बुमराह जबरदस्त कामगिरी करत आहे. त्यांने या मालिकेत आतापर्यंत सर्वाधिक विकेट घेतले आहे. तीन सामन्यांत 21 विकेट घेतले आहे. मेलबर्नमध्ये बुमराह भारताकडून कारकिर्दीतील 44वी कसोटी खेळणार आहे. या फॉरमॅटमध्ये बुमराहच्या नावावर 194 विकेट आहेत. त्यामुळे बुमराहकडे 200 विकेट पुर्ण करण्याची संधी आहे.

राजीव गांधींनी मुस्लिमांच्या विरोधामुळे ज्या पुस्तकावर बंदी घातली, ‘त्या’ पुस्तकाला 36 वर्षांनी भारतात मिळाली एन्ट्री

तर बुमराहशिवाय रवींद्र जडेजाही मेलबर्नमध्ये नवीन विक्रम करू शकतो. भारतासाठी या सामन्यात रवींद्र जडेजा 600 आंतरराष्ट्रीय विकेट पूर्ण करू शकतो. ही कामगिरी करण्यासाठी जडेजाला 7 विकेट्सची गरज आहे. जडेजाने या सामन्यात 7 विकेट घेतले तर तो भारतासाठी 600 आंतरराष्ट्रीय विकेट घेणारा पाचवा गोलंदाज ठरेल.

follow us