Devendra Fadnavis on Champions Trophy 2025 : आयसीसीने आपले वर्चस्व सिद्ध करत पुन्हा एकदा चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) जिंकली आहे. आपल्या सगळ्यांसाठी ही अभिमानाची गोष्ट आहे. कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि कोच गौतम गंभीर यांचे अभिनंदन करायला हवे. भारतीय संघाने मेहनत घेतली. कर्णधार रोहित शर्माने आपली नेहमीची पद्धत बदलून मध्येच वेगाने मध्येच संथ अशा प्रकारे खेळपट्टीवर टिकून 76 धावा काढल्या. या 76 धावाच खऱ्या अर्थाने निर्णायक होत्या. याबद्दल त्यांचे अभिनंदन, अशा शब्दांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय संघाचे कौतुक केले. तसेच विधानसभेत टीम इंडियाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला.
असंख्य भारतीय क्रिकेटप्रेमींना एक अविस्मरणीय भेट भारतीय संघाने दिली. या संपूर्ण टूर्नामेंटमध्ये भारतीय संघात एक सांघिक भावना पहायला मिळाली. टीम स्पिरिट अतिशय वाखाणण्यासारखे आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी आपल्याला सातत्याने हुलकावणी देत होती. मागचं एक शल्य मनात होतं ते काल आपण पूर्ण करू शकलो आणि लागोपाठ दोन आयसीसी विजेतेपद मिळवणारा भारत हा एकमेव देश ठरला आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मावर सातत्याने टीका होत होती. पण फॉर्म टेम्पररी असतो आणि क्लास पर्मनंट असतो हे या दोघांनी दाखवून दिले.
टीम इंडिया चॅम्पियन फायनलमध्ये न्यूझीलंडचा धुव्वा उडवत चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद
वरुण चक्रवर्ती या खेळाडूचे मी विशेष कौतुक करतो. शालेय जीवनात क्रिकेट खेळले नंतर आर्किटेक्ट झाले. क्रिकेटशी नातं तुटलं. नंतर आर्किटेक्ट म्हणून नोकरीही केली. पण त्यांच्या रक्तात क्रिकेट होते. पुन्हा क्रिकेटकडे वळले आणि आज त्यांच्या फिरकीपुढे सगळेच्या सगळे नेस्तनाबूत झाले. कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती यांनी महत्वाच्या क्षणी चांगली गोलंदाजी केली. महत्वाच्या विकेट्स त्यांनी काढल्या. चार फिरकीपटूंनी न्यूझीलंडला बांधूनच टाकलं होतं.
आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 चा अंतिम सामना संपन्न; दुबईला मिळाला कोट्यवधी रुपयांचा महसूल
चॅम्पियन्स ट्रॉफीवर तीन वेळा नाव कोरणारा भारत हा एकमेव देश आहे. चॅम्पियन टीमचे स्वागत करण्याची इच्छा आहे जसे जमेल तसे आपण करू. पण आज सभागृहाच्या अनुमतीने अभिनंदनाचा ठराव मांडत आहे. हा ठराव आपण पास करू. हा ठराव प्रशस्तीपत्राच्या रुपात करून संघाच्या प्रत्येक खेळाडूला पाठवायला हवा अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे केली.