Download App

ICC ने केली मोठी घोषणा, पुरुष आणि महिलांना मिळणार समान बक्षीस रक्कम

Cricket World Cup Prize Money : आयसीसीने (ICC) मंगळवारी मोठी घोषणा करत पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) होणाऱ्या महिला

  • Written By: Last Updated:

Cricket World Cup Prize Money : आयसीसीने (ICC) मंगळवारी मोठी घोषणा करत पुढील महिन्यात संयुक्त अरब अमिरातीमध्ये (UAE) होणाऱ्या महिला T20 विश्वचषकापासून (T20 World Cup 2024) विश्वचषक स्पर्धेत पुरुष आणि महिलांना समान बक्षीस रक्कम देण्याचा निर्णय घेतला आहे.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, महिला टी-20 विश्वचषक जिंकणाऱ्या संघाला आता 23 लाख 40 हजार अमेरिकन डॉलर्स मिळणार आहे. तर दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या महिला T20 विश्वचषक जिंकणाऱ्या ऑस्ट्रेलियाला ICC ने 1 दशलक्षची बक्षीस रक्कम दिली होती. ICC ने गेल्या वर्षीच्या तुलनेत यामध्ये आता 134 टक्क्यांनी वाढ केली आहे.

तर दुसरीकडे या वर्षी अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकाचा विजेता संघ भारतीय पुरुष संघाला 23 लाख 40 हजार यूएस डॉलर्सची बक्षीस रक्कम मिळाली होती.

आयसीसीने म्हटले आहे की, “आयसीसी महिला T20 विश्वचषक 2024 ही पहिली आयसीसी स्पर्धा असेल ज्यामध्ये महिलांना पुरुषांप्रमाणेच बक्षीस रक्कम मिळेल, जी खेळाच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण कामगिरी असेल.” जुलै 2023 मध्ये आयसीसीच्या वार्षिक परिषदेत आयसीसी हा निर्णय घेतला होता.

मोठी बातमी! वडगावशेरीत भाजपला धक्का, बापू पठारे शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये दाखल

विश्वचषकात पुरुष आणि महिलांसाठी समान पारितोषिक रक्कम असणारा क्रिकेट हा पहिला मोठा खेळ बनला आहे. महिला T20 विश्वचषक 3 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे.

‘लोकांना माझ्या पूजेची अडचण…’, पंतप्रधान मोदींचे ‘गणेश आरती’ वरून काँग्रेसला प्रत्युत्तर

follow us