IND vs NEP : आशियाई विश्वचषक सामन्यांमध्ये आज भारत विरुद्ध नेपाळ सामना रंगला. टॉस जिंकून नेपाळ संघाने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असून पहिल्या इनिंगमध्ये नेपाळने भारतासमोर 230 धावांचा डोंगर रचला आहे. यामध्ये नेपाळचा धुव्वाधार फलंदाज सोमपाल याने एकूण 48 धावांची खेळी केली तर रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजने 3-3 बळी घेतले आहेत. तर मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर, हार्दिक पांड्या यांना 1-1 यश मिळाले.
नेपाळकडून सलामीवीर यष्टीरक्षक आसिफ शेखने सर्वाधिक 58 धावांची खेळी केली. आसिफने 97 चेंडूत 8 चौकार मारले. सोमपाल कामीने 48 धावा केल्या.आसिफने सुरूवातीपासूनच आपला डाव रचला त्याने 88 चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं. कुशल भुरटेलने 38 धावा केल्या. दीपेंद्र सिंग ऐरीने 29 धावांचे योगदान दिले. गुलशन झा 23 धावा करून परतला. बाकी खेळाडूंना काही विशेष करू शकले नाहीत.
जडेजाने 3 बळी घेतले
पहिल्या पॉवरप्लेमध्ये नेपाळची सुरुवात चांगली झाली, पण 11व्या षटकापासून संघाचा धावगती मंदावली. शार्दुल आणि हार्दिकने दबाव आणला. त्यानंतर फिरकीपटू रवींद्र जडेजा आणि कुलदीप यादव यांनी नेपाळच्या फलंदाजांना धावा करण्यापासून रोखले. त्यामुळं जडेजाने 3 बळी घेण्यात यश मिळविले. त्याने भीम शार्के (7 धावा), रोहित पौडेल (5 धावा) आणि कुशल माला (2 धावा) यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
गौतमी पाटीलवर कोसळला दुःखाचा डोंगर, बेवारस सापडलेल्या वडिलांची मृत्यूशी झुंज अपयशी !
एकणू, आशिया चषक 2023 च्या पाचव्या सामन्यात नेपाळ संघाने भारतीय संघाची धारदार समजल्या जाणाऱ्या बॉलिंगच्या चिधड्या उडवल्या. टीम इंडियाच्या गचाळ फिल्डिंग आणि सुमार बॉलिंगचा पुरेपूर फायदा घेत नेपाळने धमाकेदार बॅंटिंग केली. नेपाळे टीम इंडियाला विजयासाठी 50 षटकात 231 धावा करण्याचे आव्हान दिले आहे. नेपाळने 48.1 षटकात 230 धावा केल्या.
दरम्यान, दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा आहे. हा सामना जिंकणार संघ संघ सुपर 4 साठी पात्र ठरेल. मात्र, या सामन्यात भारतीय संघ नेपाळपेक्षा बलाढ्य दिसत आहे. पण टीम इंडिया त्याला कोणत्याही किंमतीत हलक्यात घेण्याची चूक करणार नाही. दोन्ही संघांनी आजपर्यंत एकही सामना खेळलेला नाही. नेपाळचा संघ प्रथमच आशिया कपमध्ये सहभागी होत आहे.