Download App

किवींचा पराक्रम! फक्त 60 चेंडूतच जिंकला सामना, मालिकाही खिशात; पाकिस्तानचा पराभव..

पाचव्या सामन्यात पाकिस्तानने 129 धावांचे टार्गेट दिले होते. किवी संघाने फक्त 10 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावत विजय साकारला.

NZ vs PAK 5th T20I : न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यातील पाचव्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्तानचा सहज पराभव केला. या विजयासह न्यूझीलंडने पाच सामन्यांच्या मालिकेत 4-1 अशा फरकाने मालिकाही जिंकली. पाचव्या सामन्यात पाकिस्तानने 129 धावांचे टार्गेट दिले होते. किवी संघाने फक्त 10 ओव्हर्समध्ये 2 विकेट गमावत विजय साकारला.

प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 128 धावा केल्या. कर्णधार सलमानने सर्वाधिक 51 धावा केल्या. शादाब खानने 20 चेंडूत 28 धावा केल्या. या दोघांव्यतिरिक्त अन्य फलंदाज मात्र सपशेल अपयशी ठरले. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारणे शक्य झाले नाही. या सामन्यात न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी कमाल केली. जिमी नीशमने 4 ओव्हर्समध्ये 22 धावा देत 5 विकेट्स घेतल्या. जेकब डफीने 2 तर बेन सियर्स आणि ईश सोढी या दोघा गोलंदाजांनी प्रत्येकी 1-1 विकेट घेतली.

पाकिस्तानला आणखी एक धक्का, न्यूझीलंडकडून दुसऱ्या टी-20 सामन्यात 5 विकेट्सने पराभव

पाकिस्तानच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडची सुरुवात चांगली राहिली. टिम सिफर्ट आणि फिन एलन या दोघांनी 6.2 ओव्हर्समध्येच 93 धावा केल्या. फिल एलन 12 चेंडूत 27 धावा करुन बाद झाला. टिम सिफर्टने पाकिस्तानी गोलंदाजांची धुलाई सुरुच ठेवली. सिफर्टने 38 चेंडूत 97 धावा केल्या. त्याने 6 चौकार 10 षटकार खेचले. या सामन्यात पाकिस्तानचे सर्वच गोलंदाज निष्प्रभ ठरले. सुफियान मुकीमनेच फक्त 2 विकेट घेतल्या.

दरम्यान, नुकत्याच झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीत पाकिस्तानची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली. मायदेशात स्पर्धा होती तरी देखील पाकिस्तानी संघाला सेमी फायनलमध्ये सुद्धा प्रवेश घेता आला नाही. साखळी फेरीतच पाकिस्तानी संघ गारद झाला होता. तर दुसरीकडे न्यूझीलंडने मात्र या स्पर्धेत चांगली कामगिरी केली होती. न्यूझीलंडने थेट फायनल सामन्यात एन्ट्री मिळवली. परंतु, या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडचा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं.

Video : टीम इंडियाचं फडणवीसांनाही कौतुक; म्हणाले, फॉर्म हा टेम्पररी असतो, मात्र क्लास परमनंट

follow us