पाकिस्तानला आणखी एक धक्का, न्यूझीलंडकडून दुसऱ्या टी-20 सामन्यात 5 विकेट्सने पराभव

पाकिस्तानला आणखी एक धक्का, न्यूझीलंडकडून दुसऱ्या टी-20 सामन्यात 5 विकेट्सने पराभव

NZ vs PAK 2nd T20I : न्यूझीलंडने दुसऱ्या टी-20 सामन्यात शानदार कामगिरी करत पाकिस्तानचा 5 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयासह पाच सामन्यातील मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. पहिल्या सामन्यात देखील न्यूझीलंडने पाकिस्तानचा 9 विकेट्सने (NZ vs PAK) पराभव केला होता. ड्युनेडिन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात टिम सेफर्टने शानदार खेळी केली.

पावसामुळे व्यत्यय आलेला हा सामना 15-15 षटकांचा खेळवण्यात आला होता. या सामन्यात न्यूझीलंडचा कर्णधार मायकेल ब्रेसवेलने (Michael Bracewell) टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने 9 विकेट गमावल्यानंतर 135 धावा केल्या. पाकिस्तानकडून कर्णधार सलमान अली आघाने 28 चेंडूत 46 धावांची खेळी केली तर शादाब खानने 14 चेंडूत 26 धावा केल्या आणि शाहीन शाह आफ्रिदीने 14 चेंडूत 22 धावांची खेळी केली. तर न्यूझीलंडकडून जेकब डफी, बेन सीयर्स, जेम्स नीशम आणि ईश सोधीने प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या.

न्यूझीलंड 136 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 13.1 षटकात 5 गडी गमावून सामना जिंकला. न्यूझीलंडकडून टिम सेफर्टने 22 चेंडूत 45 धावा केल्या. फिन ऍलनने 16 चेंडूत 38 धावा केल्या. मिचेल हेने 16 चेंडूत 21 धावा केल्या. तर हरिस रौफने दोन, तर मोहम्मद अली, खुसदिल शाह आणि जहानाद खानने प्रत्येकी एक विकेट घेतली. मालिकेतील तिसरा सामना शुक्रवार 21 मार्च रोजी ऑकलंडमध्ये होणार आहे.

गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार पण…, नागपूर हिंसाचार प्रकरणात वडेट्टीवार सरकारवर भडकले

follow us
  • fb
  • instagram
  • youtube