Download App

ODI World Cup : न्यूझीलंडचा संघ जाहीर, ‘या’ खेळाडूंना मिळाली संधी तर गोलंदाज काइल जेमिसन बाहेर

  • Written By: Last Updated:

ODI World Cup Tournament : क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे ती एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची. (ODI World Cup Tournament) ही स्पर्धा भारतात ५ ऑक्टोबर ते १९ नोव्हेंबर दरम्यान खेळवली जाणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व संघ जोरदार तयारी करत आहेत. दरम्यान, आता एकदिवसीय विश्वचषकासाठी न्यूझीलंड संघाची (New Zealand team) घोषणा करण्यात आली आहे.

पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी आता न्यूझीलंडने सोमवारी १५ खेळाडूंची निवड केली. दुखापतीतून पुनरागमन करणारा केन विल्यमसन संघाचे नेतृत्व करेल.IPL 2023 (31 मार्च 2023) च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज (CSK) विरुद्ध सीमारेषेवर झेल घेण्याच्या प्रयत्नात विल्यमसन जखमी झाला होता. त्यांच्या उजव्या गुडघ्याला दुखापत झाली होती. यानंतर तो संपूर्ण लीगमधून बाहेर पडला होता. दरम्यान, एप्रिलमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. आता तो एकदिवसीय विश्चचषक खेळायला तयार आहे.

Maratha Revervation : मराठवाड्यातील मराठ्यांना आरक्षण मग पश्चिम महाराष्ट्रातल्यांनी घोडे मारले का? चव्हाणांचा सवाल 

वर्ल्ड कपसाठी न्यूझीलंड संघ
केन विल्यमसन (कर्णधार), ट्रेंट बोल्ट, मार्क चॅपमन, डेव्हन कॉनवे, लॉकी फर्ग्युसन, मॅट हेन्री, टॉम लॅथम (उप-कर्णधार, विकेटकीपर), डॅरिल मिशेल, जिमी नीशम, ग्लेन फिलिप्स, रचिन रवींद्र, मिशेल सँटनर, ईश सोधी, टिम साउथी आणि विल यंग.

एकदिवशीय विश्वचषक स्पर्धा भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ४६ दिवस चालेल, ज्यामध्ये ४८ सामने खेळवले जातील. पहिला सामना 5 ऑक्टोबर रोजी अहमदाबाद येथे मागील विश्वचषक विजेते आणि उपविजेते इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे.

सर्व संघ त्यांच्या संघात 15 खेळाडू ठेवण्यास सक्षम असतील, संघ 3 स्टँडबाय खेळाडूंची नावे देखील ठेऊ शकतात. विश्वचषक स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व देशांना 28 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या अंतिम संघाची यादी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे (ICC) सादर करावी लागणार आहे.

भारत-पाकिस्तान सामना 14 तारखेला
तर टीम इंडियाचा पहिला सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. कोट्यवधी क्रिकेटप्रेमी ज्या भारत-पाकिस्तान सामन्याची आतुरतेने वाट पाहत आहेत, तो 14 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

Tags

follow us