Download App

बीसीसीआयला पुणे, मुंबईचं मैदान आवडलं पण विदर्भातलं नाही, क्रिकेटप्रेमी संतापले

  • Written By: Last Updated:

नागपूर : आयसीसी वनडे विश्वचषक 2023 (ICC One Day World Cup 2023) चे वेळापत्रक काल जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार भारतात एकूण 12 ठिकाणी विश्वचषक सामने खेळवले जातील. मात्र वर्ल्डकपचा ​​एकही सामना नागपुरात होणार नाही. व्हीसीएला (VCA) एकाही सामन्याचे यजमानपद मिळाले नाही; हा विदर्भातील क्रिकेट चाहत्यांसाठी मोठा धक्का आहे. त्यामुळं विदर्भातील क्रीडाप्रेमींची घोर निराशा झाली आहे. (Not a single World Cup match in Nagpur, exclusion of VCA angers cricket lovers)

1987 मध्ये भारताने पहिला विश्वचषक आयोजित केला होता. त्यावेळी व्हीसीएच्या सिव्हिल लाइन्स स्टेडियमवर भारत-न्यूझीलंड सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात चेतन शर्माने गोलंदाजीत हॅटट्रिक घेतली, तर सुनील गावस्कर यांनी एकमेव शतक झळकावून सामना अविस्मरणीय बनवला होता. त्यानंतर 1996 आणि 2011 मध्ये जेव्हा भारताने विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद भूषवले तेव्हाही नागपूरला सामन्यांचे आयोजन झाले होते. 2016 च्या T20 विश्वचषकात तर जामठा मैदानाने केवळ महिला आणि पुरुष संघांचे सराव सामनेच आयोजित केले नाहीत तर मुख्य सामन्यांसह सुमारे 12 सामने येथे खेळवले होते. त्यात भारत-न्यूझीलंड पुरुष सामन्याचाही समावेश होता.

Video : लॉर्डसच्या मैदानावर हंगामा; बेअरस्टोने आंदोलनकर्त्याला उचलले अन्… 

दरम्यान, यंदा 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात नागपूरला एकही सामना न दिल्याने व्हीसीए पदाधिकाऱ्यांनी आश्चर्य व्यक्त केलं. VCA अध्यक्ष विनय देशपांडे म्हणाले की, नागपूरला यजमानपदापासून वंचित ठेवणे ही विदर्भातील क्रिकेट चाहत्यांसाठी खेदाची बाब आहे. विश्वचषकासारख्या आयोजन स्थळांबाबगत अंतिम निर्णय आयसीसी घेते. त्यामुळं खरे कारण काय असावं, हे सांगता येणार नाही, पण यामुळं व्हीसीएचे अधिकारी, सदस्य आणि क्रिकेट चाहत्यांना हा मोठा धक्का असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिला.

तर राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनीही VCA ला यजमानपदापासून दूर ठेवल्यानं नाराजी व्यक्त केली. विश्वचषकाचा एकही सामना नागपुरात खेळला जाणार नाही, ही अत्यंत खेदाची बाब आहे. म्हणूनच आम्ही सर्व विदर्भावासियांची बीसीसीआयकडे विनंती आहे की, त्यांनी याबद्दल पुनर्विचार करावा. जे सामने पुण्यात होणारे आहेत, त्यातले काही सामने कमी करून नागपूरच्या मैदानावर खेळवले जावेत. तसं झाले तर इथल्या जनतेला आनंद होईल,असं देशमुख म्हणाले.

अहमदाबाद ही क्रिकेटची नवी राजधानी!

विश्वचषक सामना आयोजनातून डावल्यात आल्यानंतर व्हीसीएसोबत अनेक राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बीसीसीआयच्या विद्यमान कार्यकारिणीवर टीका केली. त्रिवेंद्रमला वगळण्यात आल्यानं अहमदाबाद क्रिकेटची नवी राजधानी झाल्याचा आरोप करत शशी थरूर यांनी जय शाह यांच्यावर निशाणा साधला.

 

Tags

follow us